टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील : खोत

टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील : खोत
टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील : खोत

नांदेड : राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांना दिलासा देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. टंचाईग्रस्त गावांना मदत देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा, स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

बिलोली व देगलूर उपविभागातील कृषी, पाणीपुरवठा व दुष्काळ परिस्थितीचा आढावा खोत यांनी सोमवारी (ता. ११) आयोजित बैठकीमध्ये घेतला. आमदार राम पाटील रातोळीकर, सुभाष साबणे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, डॉ. मीनल खतगावकर, विशेष कार्य अधिकारी मधू गिरगावकर, विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, तहसीलदार विक्रम राजपूत, अरविंद बोळगे, सुरेखा नांदे, अतुल जटाळे, राजेश लांडगे आदी उपस्थित होते.

खोत म्हणाले, ‘‘टंचाई काळात ग्रामस्थांच्या पाणीपुरवठ्यासोबतच जनावरांसाठी चारा, पाणी तसेच मजुरांच्या हाताला कामाची गरज असते. त्यामुळे संबंधितांसोबत निर्णय घेऊन एकोप्याने तत्काळ कामे पूर्ण करावीत. टंचाई काळात उपाय योजनेसाठी निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा, विभाग स्तरावर दिले आहेत. पाणी पातळी कमी झालेल्या गावांतील पिण्याचे प्रश्न सुटतील, असे प्रस्ताव त्वरीत तयार करावेत. जुन्या कामांच्या दुरुस्ती प्रस्तावाला लागणारा निधी दिला जाईल. बोगस कामे केलेल्या पाणीपुरवठा कंत्राटदारांची यादी करून त्यांच्यावर कार्यवाही करावी. बिलोली आणि देगलूर उपविभागातील पाणीपुरवठा प्रश्नासंदर्भात मंत्रालयामध्ये आढावा बैठक लवकरच घेण्यात येईल.’’

कृषी विभाग तसेच पाणीपुरवठ्यासह विविध विषयांवर आमदार साबणे, पाटील- रातोळीकर यांनी चर्चा करुन सूचना केल्या. या वेळी नायब तहसीलदार संजय नागमवाड, ओमप्रकाश गोंड, पणन मंडळाचे उप-सरव्यवस्थापक शुभांगी गोंड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमावाड, विविध गावांतील सरपंच, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com