agriculture news in Marathi state govt wants centers help for milk rate issue Maharashtra | Page 2 ||| Agrowon

दूध दरप्रश्‍नी राज्याचे केंद्र सरकारला साकडे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

केंद्र सरकारने दूध भुकटीच्या निर्यातीला ३० टक्के प्रोत्साहन अनुदान द्यावे तसेच भुकटीसाठी बफरस्टॉक योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी, आदी मागण्या राज्य सरकारने केल्या आहेत.

मुंबई: राज्यातील दूध दराचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारने आता थेट केंद्र सरकारला साकडे घातले आहे. केंद्र सरकारने दूध भुकटीच्या निर्यातीला ३० टक्के प्रोत्साहन अनुदान द्यावे तसेच भुकटीसाठी बफरस्टॉक योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी, आदी मागण्या राज्य सरकारने केल्या आहेत. 

दरम्यान, दूध दर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यास्तरावर दोनदा बैठकाही झालेल्या आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. 

राज्यात दूध दरवाढीवरून राजकारण तापले आहे. दुधाच्या दर वाढीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी नुकतेच आंदोलन केले आहे. देशात सध्या दुधाचे अतिरिक्त उत्पादन होत आहे. महाराष्ट्रात तर अतिरिक्त उत्पादनाचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेला दुधाच्या भुकटीचा दोन लाख टनांचा साठा शिल्लक आहे. आधी लॉकडाउनमुळे मागणी घटल्याने सहकारी आणि खासगी संघांपुढे शिल्लक दुधाचे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

तोटा कमी व्हावा यासाठी संघांनी काही दिवसांपासून दुधाच्या खरेदी दरात घट सुरू केली आहे, याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी दूध दर वाढवून द्यावा व त्यासाठी सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी करत राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. गायीच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयातीचा निर्णय बदलावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. या आंदोलनाची सुरुवातही आक्रमक पद्धतीने झालेली आहे. 

राज्यातील दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे राज्य सरकारने टाळेबंदीच्या काळात अतिरिक्त दुधाचे रूपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना राबविली होती. दोनवेळा मुदतवाढ देत ही योजना ३१ जुलैपर्यंत राबविण्यात आली. चार महिने दररोज १० लाख लिटर दुधाचे रुपांतरण दूध भुकटीत करण्यात आले. त्यापोटी १९० कोटी इतका निधी खर्च होणार आहे. देशात अशाप्रकारची योजना एकमेव महाराष्ट्र सरकारने राबवली आहे, याकडे लक्ष वेधले जात आहे. 

दरम्यान, दूध दराच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यास्तरावर यासंदर्भात दोनदा बैठकाही झालेल्या आहेत. मात्र, शासन स्तरावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. 

मात्र, भुकटीच्या निर्याती संदर्भातील निर्णय हे केंद्र सरकारशी निगडीत असल्याने राज्य सरकारने आता केंद्राला साकडे घातले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र पाठवले आहे. यामध्ये दूध भुकटीच्या निर्यातीला ३० टक्के प्रोत्साहन अनुदान द्यावे तसेच भुकटीसाठी बफरस्टॉक योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी या प्रमुख दोन मागण्या राज्य सरकारने केलेल्या आहेत. भुकटीसंदर्भात हे दोन्ही निर्णय झाल्यास देशभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असा दावा राज्य सरकारने केला आहे.

बफरस्टॉक योजना सुरु करा, अनुदान वाढवा
भुकटीच्या निर्यातीला सध्या १० टक्के अनुदान दिले जाते. त्यामध्ये आणखी २० टक्के वाढ केल्यास प्रामुख्याने भुकटीची निर्यात वाढेल असा अंदाज आहे. तसेच देशात यापूर्वी एनडीडीबीमार्फत भुकटीचा बफरस्टॉक केला जात होता. सध्या ती योजना बंद आहे. देशात भुकटीचा मोठा साठा शिल्लक असल्याने ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.


इतर अॅग्रो विशेष
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...