राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल १८०० ते ३५०० रुपये

राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल १८०० ते ३५०० रुपये
राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल १८०० ते ३५०० रुपये

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ३१) हिरव्या मिरचीची आवक २५७ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल किमान २५०० ते कमाल ३००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २७०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. ३०) हिरव्या मिरचीची आवक ३०८ क्विंटल झाली. तिला ३००० ते ४००० रुपये असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५०० रुपये होता. सोमवारी (ता. २९) हिरव्या मिरचीची आवक ४७४ क्विंटल झाली. तिला २६०० ते ३२०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० होता. रविवारी (ता. २८) हिरव्या मिरचीची आवक ४०२ क्विंटल झाली. तिला ३००० ते ३५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२०० होता. शनिवारी (ता. २७) आवक ५८४ क्विंटल झाली. तिला १५०० ते ४५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२०० होता. शुक्रवारी (ता. २६) हिरव्या मिरचीची आवक ६२० क्विंटल झाली. तिला ३००० ते ४००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५०० होता. गुरुवारी (ता. २५ ) हिरव्या मिरचीची आवक ४९७ क्विंटल झाली. तिला २८०० ते ४००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५०० होता. मागील आठवड्यापासून बाजार समितीत हिरवी मिरचीची आवक कमी-जास्त होत आहे. चालू महिन्यात मिरची आवक वाढली असून, दरात घसरण झाली आहे.

सोलापुरात प्रतिक्विंटलला २५०० रुपये सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने दर टिकून राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक २५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात हिरव्या मिरचीची रोज १५ ते २० क्विंटल आवक राहिली. हिरव्या मिरचीची सर्व आवक स्थानिक भागातून झाली. बाहेरील आवक कमी होती. पण मागणी बऱ्यापैकी राहिली. आवक आणि मागणी यांच्यातील तफावत वाढल्याने मिरचीचे दर टिकून राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही मिरचीची आवक जेमतेम रोज १० ते १५ क्विंटल राहिली. पण दरही किरकोळ चढ-उतार वगळता स्थिर राहिले. मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १२०० रुपये, सरासरी १७०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये मिळाला. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात दरात काहीसा चढ-उतार पुन्हा झाला. पण आवक अगदीच कमी झाली. रोज १० ते १२ क्विंटल अशी आवक होती. मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये आणि सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २७०० रुपये असा दर मिळाला. गेल्या दोन-तीन आठवड्यात १०० ते २०० रुपयांच्या फरकाचा चढ-उतार वगळता दर मात्र टिकून राहिल्याचे दिसते.

जळगावात प्रतिक्विंटल १८०० ते २६०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आठवड्यात हिरव्या मिरचीच्या दरात काहीशी घसरण झाली. गुरुवारी (ता. १) मिरचीची १६ क्विंटल आवक झाली. १८०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २० जुलैपर्यंत दर स्थिर होते. नंतर दर कमी होण्यास सुरवात झाली. बारीक, लहान आकाराच्या तिखट मिरचीचे दर २६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. तिची आवक आंध्र प्रदेश, जालना भागातून होत आहे. १५ जुलैपर्यंत आवकही कमी होती. आवक मागील आठवड्यात वाढली असून, नंदुरबार, जामनेर, औरंगाबाद जिल्ह्यांतील सोयगाव, सिल्लोड, जालना भागांतून मिरची येत आहे.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल २००० ते २५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १) हिरव्या मिरचीची १०३ क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये १८ जुलैला ३१० क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २४ जुलैला १६३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २५ जुलैला ३३३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २७ जुलैला १३६ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २९ जुलैला २१९ क्‍विंटल आवक झालेल्या  हिरव्या मिरचीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३० जुलैला २१० क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

पुण्यात प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १) हिरव्या मिरचीची सुमारे १० ते १२ टेंपो आवक झाली होती. यावेळी दहा किलोला २०० ते ३०० रुपये दर होता. बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची प्रामुख्याने आवक ही आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमधून होत असते. पाऊस सुरू असल्याने अद्याप स्थानिक आवक तुरळक असून, खरिपातील उत्पादन सुरळीत सुरू झाल्यानंतर स्थानिक आवकेत वाढ होण्याचा अंदाज आडतदारांनी व्यक्त केला आहे. स्थानिक आवक कमी असल्याने तुलनेने दर वाढलेले असल्याचेही आडतदारांनी नमूद केले.

परभणीत प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १) हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सेलू तालुक्यातून तसेच बीड जिल्ह्यातून हिरव्या मिरचीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरात हिरव्या मिरचीची ४० ते ६० क्विंटल आवक झाली. त्या वेळी सरासरी प्रतिक्विंटल २००० ते ६००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १) हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होती. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २००० ते ३०००  रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

अकोल्यात प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये अकोला ः येथील जनता भाजी बाजारात हिरव्या मिरचीच्या आवकेत वाढ होत आहे. त्यामुळे दरांमध्ये गेल्या काही दिवसांत घसरण आली आहे. गुरुवारी (ता. १) येथील बाजारात २००० ते ३५०० रुपयांदरम्यान मिरचीची विक्री झाली. हिरव्या मिरचीची स्थानिक जिल्ह्यासह लगतच्या भागातून आवक होऊ लागली आहे. परिणामी, आठ ते दहा दिवसांपूर्वी असलेले तीन हजार रुपयांवरील सरासरी दर कमी झाले. आता मिरची कमीत कमी २००० रुपये प्रतिक्विंटलपासून विक्रीला सुरवात होत आहे. चांगल्या दर्जाची मिरची ३५०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल विक्री झाली. मिरचीची ४० ते ५० क्विंटलपेक्षा अधिक आवक होत आहे. किरकोळ बाजारात ग्राहकांना हिरवी मिरची प्रतिकिलो ४० ते ६० रुपयांदरम्यान विक्री केली जात आहे. मिरचीची आवक वाढल्यास दरांमध्ये आणखी बदल होऊ शकतील, असा अंदाज व्यापारी सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com