राज्यात उद्यापासून सर्वदूर पावसाचा अंदाज

राज्यात उद्यापासून सर्वदूर पावसाचा अंदाज
राज्यात उद्यापासून सर्वदूर पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. तर विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर येथे उष्णतेची तीव्र लाट आली असून, ब्रह्मपुरी येथे देशातील ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अाहे. शनिवार (ता. १२) राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.    राजस्थानपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर लक्षद्वीप आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, शुक्रवारपासून कोकण मध्य महाराष्ट्रात पूर्वमोसी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारपासूनच राज्यात ढगाळ हवामान तयार होत असल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. उन्हाचा ताप वाढल्याने मध्य महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले अाहे.  गुरुवारी (ता. १०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.७, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३९.१, महाबळेश्वर ३४.८, मालेगाव ४२.६, नाशिक ४०.१, सांगली ४०.५, सातारा ४१.१, सोलापूर ४३.२, मुंबई ३४.०,अलिबाग ३२.५, रत्नागिरी ३४.८, डहाणू ३४.४, आैरंगाबाद ४१.२, परभणी ४३.६, अकोला ४४.१, अमरावती ४३.८, ब्रह्मपुरी ४६.७, बुलडाणा ४१.२, चंद्रपूर ४६.६, गोंदिया ४३.०, नागपूर ४४.६, वर्धा ४४.५, यवतमाळ ४३.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com