agriculture news in Marathi state horticulture scheme stopped Maharashtra | Agrowon

राज्याची फळबाग योजना रखडली 

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 मे 2020

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात अडचणी आहेत. मुळात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे कॉमन सर्व्हिसेस सेंटरच्या सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच, आर्थिक उद्दिष्ठे राज्य शासनाकडून आलेली नाहीत. आर्थिक नियोजन व लॉकडाऊनची स्थिती असे दोन्ही मुद्दे स्पष्ट झाल्यानंतर ऑनलाइन कामकाज सुरू होईल. 
- शिरिष जमदाडे, फलोत्पादन संचालक 

पुणे: राज्यात नव्या फळबागा उभारण्यासाठी कृषी विभागाची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अद्यापही सुरू न केल्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत. 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत केंद्र व राज्याकडून कोट्यवधी रुपयांचा निधी कृषी विभागाकडे येतो. त्यातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. योजनेसाठी मार्चमध्येच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होते. यंदा मात्र वेळापत्रक विस्कळीत झाले आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, औषधी घटक योजना आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचे काम कृषी आयुक्तालयात फलोत्पादन संचालकांच्या अखत्यारित चालते.

‘‘ऑनलाइन अर्जाची यंदाची प्रक्रिया कशी असेल हे क्षेत्रिय पातळीवर आयुक्तालयाने अद्याप कळवलेले नाही. गेल्या हंगामात मार्चमध्येच प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्जासाठी महिनाभर अवधी मिळाला,’’ अशी माहिती एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने दिली. 

‘‘फलोत्पादन अभियानात गेल्या वर्षी सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे प्रकल्प लॉकडाऊनमुळे रखडले आहेत. त्यामुळे अपूर्ण प्रकल्पांना प्राधान्यांना अनुदान देण्यासाठी कृषी विभागाला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल.”, असा मुद्दा शेतकरी मांडत आहेत. याबाबत फलोत्पादन संचालक श्री. जमदाडे म्हणाले की, ‘‘आम्ही हा मुद्दा विचारात घेतलेला आहे. गेल्या हंगामात पूर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्राधान्याने विचार केला जाईल.’’ 

फलोत्पादन अभियान रखडल्याने काय होणार 

  • शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्जाची तयारी करता आली नाही 
  • लॉटरी रखडल्याने पूर्वसंमतीची प्रक्रिया रखडली 
  • शेततळे, पॉलिहाऊस, शेडनेट, कांदाचाळ, फळबागेची कामे रखडणार 
  • फलोत्पादन यांत्रिकीकरणाची सुविधा मिळण्यात अडचणी 

इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...