agriculture news in Marathi state horticulture scheme stopped Maharashtra | Agrowon

राज्याची फळबाग लागवड योजना बंद 

सुर्यकांत नेटके
मंगळवार, 27 जुलै 2021

फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (नरेगा)मधून फळबाग लागवड सुरु आहे.

नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (नरेगा)मधून फळबाग लागवड सुरु आहे. मात्र गेल्या वर्षीपासून राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना बंद असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे जॉबकार्ड नाही तसेच बहुभूधारक शेतकऱ्यांना फळबाग लागवडीच्या सरकारी योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. या योजनेतून फळबाग लागवड करण्यासाठी एप्रिलमध्येच प्रस्ताव मागवतात. दोन वर्षांत मात्र प्रस्तावच मागवले नाहीत. 

पीक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना राबवली जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) योजनेत पात्र नसलेल्या व जॉब कार्डधारक पाच एकरांच्या आतील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते.

मात्र जॉबकार्ड नसलेल्या व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळावे यासाठी राज्यात सन २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली. 

योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जमीन तयार करणे, खत मिश्रणाने खड्डे भरणे, कुंपण करणे, खते देणे, आंतरमशागत करावी लागते तर खड्डे खोदणे, कलमे/रोपे लागवड, नांग्या भरणे, ठिबक सिंचन करणे, पीक संरक्षणासाठी अनुदान मिळते. हेक्टरी साधारण ५३ हजार रुपयांपर्यंत योजनेतून अनुदान मिळते. 

गेल्या वर्षीपासून मात्र ही योजना बंद आहे. दरवर्षी साधारण एप्रिल महिन्यात जाहिरात काढून फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले जातात. मात्र दोन वर्षांपासून जाहिरातच निघाली नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गेल्या वर्षी ३८ हजार हेक्टरवर लागवड झाली. यंदा राज्यात ६० हजार हेक्टरवर लागवड करण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. मात्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) योजनेत पात्र नसलेल्या व जॉब कार्डधारक पाच एकराच्या आतील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी फळबाग लागवडीपासून वंचित आहे. योजना कधी सुरू होणार हे विचारण्यासाठी शेतकऱ्यांच्या कृषी विभागात चकरा सुरू आहेत. 

कोरोनाचा परिणाम 
गेल्या वर्षीपासून राज्यात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे राज्यावर आर्थिक ताण आला आहे. त्याचाच परिणाम म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत पात्र नसलेल्या शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी असलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच मागेल त्याला शेततळे योजनाही गेल्या वर्षीपासून बंद आहे. याशिवाय कृषी विभागातील अन्य काही योजनांच्या निधीतही कपात झाल्याचे सांगितले जात आहे. 

प्रतिक्रिया
बहुभूधारक, जॉब कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांना फळबाग लावण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर योजनेतून फळबाग लागवड योजना आहे. मात्र गेल्या वर्षीपासून योजना बंद आहे. त्यामुळे आमचे फळबाग लावण्याचे नियोजन असून लागवड करता येईना. अन्य सगळ्या योजना सुरू आहेत. त्यामुळे ही योजनाही सुरू करणे गरजेचे आहे. 
- प्रा. नामदेव सानप, शेतकरी  


इतर अॅग्रो विशेष
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...