राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला

मुंबई : राज्य विधिमंडळाचे नियोजित अर्थसंकल्पीय अधिवेशन १८ फेब्रुवारी ऐवजी २५ फेब्रुवारी २०१९ पासून सुरू करण्याची विनंती राज्यपाल सी विद्यासागर राव यांना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अधिवेशनात २७ फेब्रुवारी रोजी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. केंद्राकडून विविध योजनांसाठी मिळणारे अर्थसाहाय्य लक्षात घेऊन राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्यात येत असल्याने तो बहुतांशी केंद्राच्या अर्थसंकल्पावर आधारित असतो. केंद्र सरकार संसदेत आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असल्याने राज्य सरकारही संपूर्ण वर्षभराचा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यातील अधिवेशनात सादर करू शकणार नाही. त्यामुळे राज्याकडूनही अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. याआधी २००९ व २०१४ या निवडणूक वर्षात तत्कालीन सरकारनेही अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता व लोकसभा निवडणुकांनंतर झालेल्या अधिवेशनात नियमित अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com