agriculture news in marathi, State IT and WEF signs MOU | Agrowon

शाश्‍वत शेतीसाठी नव तंत्रज्ञानाचे योगदान आवश्यक : मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाचा वर्ल्ड ईकॅानॅामिक फोरमशी सामंजस्य करार

मुंबई : नव तंत्रज्ञानामुळे जग आता एक होऊ लागले आहे. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला ही एक संधी आहे. कृषी क्षेत्राच्या शाश्वततेबाबतची चर्चा सुरू आहे. अशावेळी या नव तंत्रज्ञानाने कृषी क्षेत्रात योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

राज्य माहिती तंत्रज्ञान विभाग आणि वर्ल्ड ईकॅानॅामिक फोरम यांच्या दरम्यान ‘सेंटर फॅार दि फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन (C4IR-सीफॅार-आयआर)’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.१) सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास वर्ल्ड ईकॅानॅामिक फोरमच्या सरीता नायर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस.मदान, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवासन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘नव तंत्रज्ञानाच्या वापरातून आपण लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. कृषी, आरोग्य क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता येईल. आरोग्य सुविधा दुर्गम भागापर्यंत पोहचविता येईल. कृषी क्षेत्राच्या शाश्वततेबाबतची चर्चा सुरू आहे. अशावेळी या नव तंत्रज्ञानाने कृषी क्षेत्रात योगदान देणे आवश्यक आहे. शासनाकडे मोठ्या प्रमाणात 'डाटा' आहे. त्यामुळे औद्योगिक, वित्त्तीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या बदलाच्या काळात समन्वयाने प्रयत्न केल्यास विकासाच्या अनेक संधींना गवसणी घालता येईल.’’

प्रधान सचिव श्रीनिवासन यांनी या करारानुसार स्थापन करण्यात येणारे केंद्र हे अनेकविध क्षेत्रातील 'स्टार्टअप'च्या विकासासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. वित्तीय, कृषी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन या क्षेत्रात नव तंत्रज्ञानाच्या वापराबाबतचे अशा प्रकारचे हे देशातील दुसरे केंद्र आहे. तर 'फिनटेक' धोरण निश्चित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या करारामुळे माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान बदलाशी निगडीत प्रशिक्षणासह विविध बाबींचा अंतर्भाव असेल. ज्यामध्ये आर्टिफिशीयल इंटेलीजन्स, आयओटी आणि विशेषतः ब्लॅाकचेन या नव्या प्रणालीद्वारे राज्याचे माहिती तंत्रज्ञान धोरण अद्ययावत करण्यात येणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...