agriculture news in Marathi, state Kharip meeting may be on 3rd june, Maharashtra | Agrowon

राज्याची खरीप आढावा बैठक ३ जूनला शक्य
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 मे 2019

मुंबई: लोकसभा निवडणुकीमुळे लांबलेली राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठक सोमवारी(३ जून) होण्याची शक्यता आहे. राज्यातील खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा या बैठकीत होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या बैठकीला मार्गदर्शन करतील. महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख आदींच्या प्रमुख उपस्थितीत दादरच्या रवींद्र नाट्यमंदिरात ही बैठक होणार असल्याचे सांगितले जाते. 

मुंबई: लोकसभा निवडणुकीमुळे लांबलेली राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठक सोमवारी(३ जून) होण्याची शक्यता आहे. राज्यातील खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा या बैठकीत होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या बैठकीला मार्गदर्शन करतील. महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख आदींच्या प्रमुख उपस्थितीत दादरच्या रवींद्र नाट्यमंदिरात ही बैठक होणार असल्याचे सांगितले जाते. 

सतराव्या लोकसभेसाठी राज्यात चार टप्प्यात मतदान झाले. २९ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. तोपर्यंत जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर यंत्रणेने खरीप हंगामाच्या तयारीला हात घातला. त्यानुसार गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यांच्या ठिकाणी हंगामाच्या तयारीचा आढावा सुरू आहे. आता राज्यस्तरीय बैठकीत राज्याच्या एकंदरीत तयारी आढावा घेतला जाईल. एरवी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यस्तरीय आढावा बैठक होत असते, पण लोकसभा निवडणुकीमुळे यंदाची राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व तयारीची बैठक सुमारे महिनाभर लांबली आहे. येत्या ३ तारखेला ही बैठक होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दादर येथील रवींद्र नाट्य मंदिरात ही बैठक होईल. 

या बैठकीसाठी सुमारे चारशे मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे. कृषी खात्यांसह सहकार आणि इतर विविध विभागांचे प्रमुख, कृषी आयुक्त, विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समित्यांमधील कृषी समित्यांचे सभापती आदींना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. कृषी खात्याचे राज्यभरातील उच्चपदस्थ अधिकारीही या वेळी उपस्थित असणार आहेत. त्याशिवाय सहकार विभागाचे उच्चपदस्थही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नाबार्ड, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच इतर बँकांचे पदाधिकारीही बैठकीला येतील. 

बैठकीत खरिपाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यंत्रणेला मार्गदर्शन करतील. कृषी खात्याला सरकारी यंत्रणेला प्रोत्साहित करण्याचे काम या वेळी केले जाईल. शेतकऱ्यांना विशेषतः खते, बी-बियाणे पुरेशा प्रमाणात आणि वेळेवर पुरवठा करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना खरिपासाठी पतपुरवठा महत्त्वाचा असतो. यासंदर्भातही धोरण निश्चित केले जाणार असल्याचे कृषी खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेना युतीला मोठे यश मिळाले आहे, येत्या ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेतील यशामुळे फडणवीस सरकारचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावरील या आगामी खरीप हंगामाच्या तयारीत कोणतीही कसूर राहू नये याची खबरदारी राज्य सरकारच्यावतीने घेतली जाईल, अशी शक्यता आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...
मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी...परभणी: मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी व्यापक...
शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीतून...बुलडाणा  ः कृषी विभागाने लष्करी अळीच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होणार...नाशिक: बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड...
लष्करी अळीची शेतकऱ्यांमध्ये धास्तीरुईखेड मायंबा, जि. बुलडाणा ः ‘‘अमेरिकन लष्करी...
फवारणी केलेला मका चाऱ्यात वापरू नका:...पुणे (प्रतिनिधी)ः  राज्यात सध्या मक्यावर...
लष्करी अळीमुळे डेअरी, पोल्ट्रीला १३००...पुणे : राज्यातील डेअरी व पोल्ट्री उद्योगासाठी...
बाजार समित्यांतील रोख व्यवहारांवरील...नवी दिल्ली ः रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणून...
अन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...
मराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ! चिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...