agriculture news in marathi, state lavel conferance on farmers issue in november, nanded, maharashtra | Agrowon

शेतकरीप्रश्नी १५ नोव्हेंबरला मुंबईत राज्यव्यापी परिषद : डॉ. अजित नवले
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

नांदेड  ः यंदाचा दुष्काळ नवी लढाई सुरू करणारा ठरणार आहे. केंद्र शासनाची दुष्काळ व्यवस्थापन संहिता अत्यंत किचकट, जटील, अशास्त्रीय आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यासाठी पैसेवारीसारख्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब करावा, अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या दुष्काळ, कर्जमाफी, हमीभाव, निवृत्तिवेतन आदी प्रश्नांवर राज्य तसेच केंद्र सरकारला झुकविण्यासाठी १५ नोव्हेंबरला मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी परिषद घेण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.

नांदेड  ः यंदाचा दुष्काळ नवी लढाई सुरू करणारा ठरणार आहे. केंद्र शासनाची दुष्काळ व्यवस्थापन संहिता अत्यंत किचकट, जटील, अशास्त्रीय आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यासाठी पैसेवारीसारख्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब करावा, अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या दुष्काळ, कर्जमाफी, हमीभाव, निवृत्तिवेतन आदी प्रश्नांवर राज्य तसेच केंद्र सरकारला झुकविण्यासाठी १५ नोव्हेंबरला मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी परिषद घेण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.

अखिल भारतीय किसान सभेची मराठवाडा विभागस्तरीय बैठक शुक्रवारी (ता. १२) नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी डॅा.नवले बोलत होते. या वेळी किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, कार्याध्यक्ष अर्जुन आडे, राज्य सहसचिव विलास बाबर, शंकर सिडाम, रामकृष्ण शेरे, उद्धव पौळ, मुरलीधर  नागरगोजे, गोविंद अर्दड, अंकुश बुधवंत, तानाजी वाघमारे, संजय मोरे, लिंबाजी कचरे आदी उपस्थित होते.

या वेळी डाॅ. नवले म्हणाले, की मराठवाड्यातील दुष्काळस्थिती गंभीर आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाची दुष्काळ व्यवस्थापन संहिता किचकट आहे. ती कार्यकर्त्यांनी समजून घ्यावी. गावांतील शेतकऱ्यांना देखील ती समजून सांगावी लागणार आहे. पारंपरिक पद्धतीनेच दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे. दुष्काळामुळे पीक उत्पादनात घट आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. दीड लाख रुपये मर्यादेची अट रद्द केली पाहिजे. शेतीमालास दीडपट हमीभाव दिला पाहिजे. हमीभावाची लढाई पूर्ण ताकदीने लढण्यासाठी तहसील कार्यालया सोबतच बाजार समित्यांमध्ये देखील लढा द्यावा लागणार आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य तसेच केंद्र सरकारला झुकविण्यासाठी १५ नोव्हेंबरला मुंबईत राज्यव्यापी परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेला भाजप सोडून सर्व राजकिय पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.  शेतकऱ्यांच्या देशभरातील १८० संघटना २८, २९, ३०  नोव्हेंबरला दिल्ली येथे लाॅग मार्च काढणार आहेत. तत्पूर्वी २२ आणि २३ आॅक्टोबरला कोल्हापूर येथे कार्यकर्ता कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे, असेही डॉ. नवले यांनी नमूद केले.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...