agriculture news in Marathi state lead first in country Maharashtra | Agrowon

शिखर बॅंक देशात पहिल्या स्थानावर 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 मार्च 2021

सहकारी संस्थांची आर्थिक धमनी समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंके’ला इतिहासात प्रथमच ३२५ कोटींचा नफा झाला आहे.

पुणे : सहकारी संस्थांची आर्थिक धमनी समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंके’ला इतिहासात प्रथमच ३२५ कोटींचा नफा झाला आहे. ४१ हजार कोटींच्या पुढे उलाढाल करणारी राज्य बॅंक आता देशातील इतर राज्य बॅंकांच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. 

सहकारी संस्थांची प्रमुख अर्थपुरवठादार असलेल्या या बॅंकेला ‘शिखर बॅंक’देखील म्हटले जाते. मात्र मधल्या काळात गैरव्यवहार, बेकायदेशीर कर्जवाटप, चौकश्या आणि संचालक मंडळाच्या बरखास्तीच्या फेऱ्यात बॅंक सापडली. त्यामुळे बॅंकेच्या पुढील आर्थिक भवितव्याचा प्रश्‍न तयार झाला. 

मार्च २०२० अखेर मध्य प्रदेशच्या राज्य बॅंकेला १२९ कोटींचा नफा झाला होता. आंध्र शिखर बॅंकेला ९६ कोटी, तर गुजरात बॅंकेला ३१ कोटींचा निव्वळ नफा झाला. त्यामुळे महाराष्ट्राची शिखर बॅंक देशात अव्वल स्थानावर असल्याचे स्पष्ट होते, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

गैरकारभारामुळे रिझर्व्ह बॅंकेने २००१ मध्ये महाराष्ट्राच्या राज्य बॅकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर सक्त वसुली संचालनालयाची चौकशीदेखील या बॅंकेच्या मागे लागली. अशा स्थितीत प्रशासक विद्याधर अनास्कर व व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. आर. देशमुख यांनी बॅंकेला आर्थिक व प्रशासकीय दिशा देण्याचे काम वेगाने सुरू ठेवले. त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. 

‘‘तोट्याकडे झुकलेली बॅंक प्रशासक मंडळाच्या कडक धोरणामुळे आता लेखापरीक्षणाच्या अ श्रेणीची मानकरी ठरली आहे. बॅंकेचा ढोबळ नफा १३४५ कोटी, तर निव्वळ नफा सव्वातीनशे कोटींवर गेल्याने आम्हाला चांगले दिवस आले आहेत,’’ अशी माहिती बॅंकेच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 

कोविड १९ परिस्थितीमुळे शिखर बॅंकेला अनेक अडचणींना सामना करावा लागतो आहे. यामुळे यंदा एनपीए (अनुत्पादक मालमत्ता) वाढेल; मात्र इतर बाबतींत चांगली कामगिरी बॅंकेची राहील. मुळात रिझर्व्ह बॅंकेच्या अनेक अटी असल्यामुळे इच्छा असूनही विविध उपक्रम बॅंकेला राबविता येत नाही. अशा स्थितीत देखील बॅंकेने अनुत्पादक कर्जांसाठी १०० टक्के तरतूद केली. त्यामुळे निव्वळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण शून्यावर आणले गेले आहे. 

१९ निकषांमध्ये स्थान 
‘नाबार्ड’ने उत्तम बॅंकिंग व्यवस्थेसाठी लावलेल्या २९ पैकी १९ निकषांमध्ये शिखर बॅंकेने स्थान पटकावले आहे. इतर दहा निकषांमध्ये सरासरीपेक्षा काही अंशांनी कमतरता आहे. मात्र ती देखील भरून काढण्याचा प्रयत्न अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून चालू आहे. 

अशी आहेत शिखर बॅंकेची वैशिष्ट्ये 

  • एकूण उलाढाल : ४१६६६ कोटी 
  • भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) : १३.११ (मार्च २०२० अखेर) 
  • नक्त मूल्य (नेटवर्थ) : २२८२ कोटी 
  • स्वनिधी : ४७८४ कोटी 
  • ढोबळ नफा ः १३४५ कोटी 
  • निव्वळ नफा ः ३२५ कोटी 
  • शाखा ः ५४ (वर्ष २०१८ नुसार) 
  • सहयोगी जिल्हा बॅंका ः ३१ 
  • जिल्हा बॅंकांच्या शाखा ः ३६६७ 
  •  विविध कार्यकारी सोसायट्या ः २१२१४ 

इतर अॅग्रो विशेष
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...