agriculture news in Marathi state on lead in FRP distribution Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 जुलै 2021

साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक स्थितीतून जात होता. मात्र, समस्या असूनही देशात रास्त व किफायतशीर किमतीनुसार (एफआरपी) शेतकऱ्यांना रक्कम वाटण्यात राज्यातील साखर कारखान्यांनी आघाडी घेतली आहे.

पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक स्थितीतून जात होता. मात्र, समस्या असूनही देशात रास्त व किफायतशीर किमतीनुसार (एफआरपी) शेतकऱ्यांना रक्कम वाटण्यात राज्यातील साखर कारखान्यांनी आघाडी घेतली आहे,’’ अशा शब्दांत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कौतुक केले. 

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (विस्मा) अद्ययावत सभागृहाचे उद्‌घाटन केल्यानंतर विस्माच्या पदाधिकाऱ्यांशी आयुक्तांनी संवाद साधला. विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे या वेळी उपस्थित होते. 

राज्यातील १९० साखर कारखान्यांनी १५ जुलैपर्यंत १०१४ लाख टन ऊस खरेदी केला. यातून एफआरपीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २४ हजार कोटी रुपयांपेक्षा रक्कम जमा करण्यात आली आहे. आयुक्त या वेळी म्हणाले, की आगामी हंगामात १२ लाख ३१ हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध असेल. त्यामुळे अतिरिक्त साखर तयार न करता कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा.’’ 

या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, विस्माचे सरचिटणीस पांडुरंग राऊत, कार्यकारी संचालक अजित चौगुले, कार्यकारी मंडळ सदस्य माधवराव घाटगे, रणजित मुळे, महेश देशमुख, अविनाश जाधव, सनदी लेखापाल रामेश्‍वर नेहेरे, साखर संचालक (प्रशासन) उत्तम इंदलकर, संचालक (अर्थ) ज्ञानदेव मुकणे, सहसंचालक (प्रशासन) राजेश सुरवसे यांनी चर्चेत भाग घेतला. 

आगामी हंगामात १०५ लाख टन उत्पादन शक्य ः ठोंबरे 
आगामी हंगामात १६ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली जाईल, तसेच उत्पादन १०५ लाख टनांपर्यंत होईल, असा अंदाज ठोंबरे यांनी या वेळी व्यक्त केला. ‘‘१०० खासगी साखर कारखान्यांनी राज्यातील ४० टक्के साखर तयार केली आहे. इथेनॉल, सहवीज, बायोसीएनजी, सॅनिटायझर, ऑक्सिजननिर्मिती अशा आघाडीवर कामे करताना निर्यातदेखील महाराष्ट्राने यंदा आघाडी घेतली आहे,’’ असेही ठोंबरे यांनी नमूद केले. 


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...