Agriculture news in marathi, In the state, lemon per quintal is Rs 1500 to 10000 | Agrowon

राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते १०००० रूपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लिंबूचा प्रतिक्विंटलचा दर सर्वाधिक १० हजार रुपयांपर्यंत उच्चांकी पातळीवर पोचला. गेल्या काही दिवसांपासून लिंबांना चांगला उठाव मिळत असल्याने दर तेजीत राहिले, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लिंबूचा प्रतिक्विंटलचा दर सर्वाधिक १० हजार रुपयांपर्यंत उच्चांकी पातळीवर पोचला. गेल्या काही दिवसांपासून लिंबांना चांगला उठाव मिळत असल्याने दर तेजीत राहिले, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

बाजार समितीच्या आवारात लिंबांची रोजची आवक १० ते १५ क्विंटल इतकीच मर्यादित आहे. एकाद्या दिवशीच ती २० क्विंटलपर्यंत पोचते. पण, गेल्या काही दिवसांत मागणी आणि आवकेत तफावत वाढत असल्याने दरात सुधारणा आहे. या सप्ताहात लिंबांना प्रतिक्विंटलला किमान १८०० रुपये, सरासरी ५ हजार ५०० रुपये आणि सर्वाधिक १० हजार रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहात लिंबूची आवक प्रतिदिन जेमतेम ५ ते ७ क्विंटल राहिली. दर प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी ५००० रुपये आणि सर्वाधिक १० हजार रुपये होता. 

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हाच दर किमान २००० रुपये, सरासरी ५००० रुपये आणि सर्वाधिक १० हजार रुपयांवर स्थिर होता. पण, किरकोळ चढ-उतार वगळता लिंबांना सध्या सर्वाधिक १० हजार रुपयांवर दर स्थिर आहे.

पुण्यात प्रतिगोणी ६०० ते ७०० रुपये

 पुणे बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १९) लिंबाची स्थानिक आणि गुजरात येथून सुमारे १ हजार गोणी आवक झाली. या वेळी प्रती गोणीला ६०० ते ७०० रुपये दर मिळाले. पावसामुळे ग्राहक कमी असल्याने लिंबाची आवक, मागणी आणि दर स्थिर असल्याचे व्यापारी रोहन जाधव यांनी सांगितले.  

राज्यात एकीकडे ओलादुष्काळ सदृश्‍य, तर दुसरीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे. लिंबांचे उत्पादन होत असलेल्या भागात पावसाने दडी मारल्याने उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, बाजारातील लिंबाची स्थानिक आवक घटली आहे. गुजरात येथून लिंबाची आवक होत आहे.

बाजारात लिंबाची प्रामुख्याने आवक ही नगर जिल्ह्याच्या विविध भागांतून होत असते. या हंगामात सरासरी दीड ते दोन हजार गोणींची आवक होत असते. मात्र, सध्या केवळ २०० ते ३०० गोणीच आवक होत असून, आवक कमी झाल्याने गुजरात येथून आवक वाढली आहे. तेथून सुमारे ५०० ते ६०० गोणी आवक होत आहे.

 मागणी वाढल्याने दर प्रती गोणीला १ हजार रुपयांपर्यंत वाढले होते. मात्र, सध्या मागणी कमी असल्याने दर ६०० रुपयांपर्यंत असल्याचे जाधव यांनी सांगितले. एका गोणी साधारण १५ किलोची असते. तर एका गोणीमध्ये आकारानुसार ४०० ते ७०० लिंबे असतात.

परभणीत ४ ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर

परभणी येथील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १९) लिंबांची १५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील पोखर्णी, पांगरी तसेच सेलू तालुक्यातून लिंबाची आवक येत आहे.

गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी लिंबाची १० ते १५ क्विंटल आवक होती. त्या वेळी ४००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. गुरुवारी (ता. १९) लिंबाची १५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये, तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ७० ते ८० रुपये दराने झाली, असे व्यापारी मंहमद ख्वाजा यांनी सांगितले.

नाशिकात प्रतिक्विंटल २५०० ते ६००० रुपये

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार (ता. १८) रोजी लिंबांची आवक १२ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ६००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता. १७) लिंबूची आवक १६ क्विंटल झाली. त्यांना २००० ते ५५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० मिळाला. सोमवारी (ता. १६) लिंबांची आवक १० क्विंटल झाली. त्यांना २००० ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० मिळाला. शनिवारी (ता. १४ ) लिंबांची आवक १४ क्विंटल झाली. त्यांना २००० ते ५५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० होते.

शुक्रवारी (ता. १३) लिंबांची आवक १५ क्विंटल झाली. त्यांना २००० ते ४५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० रुपये राहिले. गुरुवारी (ता. १२) आवक १२ क्विंटल झाली. त्या वेळी १२५० ते २५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० रुपये राहिले. मागील आठवड्यापासून बाजार समितीत लिंबूच्या अवकेत चढ-उतार सुरू आहे. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे बाजारभावतही चढ उतार दिसून आला.

औरंगाबादेत प्रतिक्विंटला ३५०० ते ६००० रुपये 

औरंगाबाद  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १९) लिंबांची २३ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ३५०० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ४ सप्टेबरला ३० क्‍विंटल आवक झालेल्या लिंबांचे दर ३५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. ९ सप्टेंबरला ९ क्‍विंटल आवक झाली. त्यांना २५०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११ सप्टेंबरला १८ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी ४००० ते ७००० रुपये मिळाले. १४ सप्टेंबरला आवक १५ क्‍विंटल, तर दर ४००० ते ७००० रुपये राहिला. १६ सप्टेंबरला ९ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी ४००० ते ६५०० रुपये दर मिळाला. १८ सप्टेंबरला लिंबांची आवक २१ क्‍विंटल झाली. त्या वेळी ३५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाले.

जळगावात प्रतिक्विंटलला १८०० ते २२०० रुपये

जळगाव  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाचे दर महिनाभरापासून स्थिर आहेत. आवक मागील पंधरवड्यात प्रतिदिन आठ क्विंटल अशी राहिली आहे. गुरुवारी (ता. १९) नऊ क्विंटल आवक झाली. दर १८०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाला. लिंबांची आवक जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, एरंडोल, भुसावळ व धुळे येथून होत आहे. जूननंतर दर कमी झाले. त्यात आतापर्यंत फारशी वाढ झालेली नसल्याचे सांगण्यात आले. 

सांगलीत प्रतिशेकडा २०० ते ५०० रुपये

सांगली येथील शिवाजी मंडईत लिंबाची आवक कमी झाली आहे. दरात मात्र वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. १९) लिंबांची  ६० गोणी (एक गोणी २५ किलोचे) आवक झाली. त्यांना प्रतिशेकडा २०० ते ५०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

मंडईत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, कुर्डूवाडी आणि कर्नाटकातून लिंबांची आवक होते. बुधवारी (ता. १८) ६५ गोणी आवक झाली. त्यांना प्रतिशेकडा १५० ते ४५० रुपये मिळाले. मंगळवारी (ता. १७) लिंबांची ७० गोणी आवक झाली. त्यांना प्रतिशेकडा २००  ते ४५० रुपये मिळाले. 

सोमवारी (ता. १६) ६५ गोणींची आवक, तर दर प्रतिशेकडा १५० ते ४५० रुपये, रविवारी (ता. १५) ७० गोणींची आवक, तर दर २५० ते ६०० रुपये असा मिळाला. 

गतसप्ताहात लिंबांची आवक ८० ते ९० गोण्यांची होती. चालू सप्ताहात ती २५ ते ३० गोण्यांनी कमी झाली. त्यांना प्रतिशेकडा ९०  ते १५० रुपयांनी दर वाढले आहेत. पुढील सप्ताहापर्यंत लिंबांची आवक आणि दर स्थिर राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

अकोल्यात १५०० ते ५००० रुपये 

अकोला येथील बाजारात लिंबूचा दर किमान १५ ते ५० रुपये किलो दरम्यान मिळत आहे. पावसाळ्याचा कालावधी सुरू असल्याने लिंबाची मागणी सध्या कमी आहे. बाजारातील आवक ३०० गोणी (प्रतिगोणी वजन १४ किलो) आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.  

अकोला जिल्ह्यात लिंबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथील लिंबू विविध देशांत जाते. सध्या जुनी तसेच नवीन बहराची फळे बाजारात येत आहेत. मध्यंतरी झालेल्या सलग पावसामुळे लिंबू फळांचा दर्जा खालावला होता. हा दुय्यम दर्जाचा माल १५० ते २०० रुपये गोणी विकला जात आहे. चांगल्या दर्जाच्या फळांचे दर गोणीला ५०० रुपयांवर अधिक निघत असल्याचे सांगण्यात आहे.

 सध्या लिंबाचा सरासरी दर १५ रुपये प्रतिकिलोपासून ५० रुपयांपर्यंत मिळत आहे. पावसाळी कालावधीमुळे लिंबाची मागणी तितकी नाही. जुना बहार, नवीन बहरातील फळे विक्रीसाठी येत आहेत. चांगल्या दर्जाच्या फळांना उत्कृष्ट दर असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

कोल्हापुरात २ ते ३ हजार रुपये

कोल्हापूर येथील बाजार समितीत लिंबांना क्विंटलला दोन ते तीन हजार रुपये इतका दर मिळाला. लिंबांची दररोज ३०० ते ४०० पोती आवक होत आहे. बाजार समितीत बेळगाव भागातून लिंबाची आवक होते. गेल्या पंधरवड्यापासून लिंबाचे दर व आवक स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

गणेशोत्सवामध्ये लिंबूचे दर काही प्रमाणात वाढले होते. परंतु, अनंतचतुर्दशीनंतर लिंबाच्या मागणीत घट  झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.


इतर बाजारभाव बातम्या
हिंगोलीत हरभरा ४१०० ते ४३५८ रुपये...हिंगोली : ‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
राज्यात कांदा १०० ते ११०० रुपये क्विंटल पुणे : कोरोनामुळे विस्कळीत झालेली शेतमालाची...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये शेवगा ४ ते ६ हजार रुपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ...
विदर्भात तूरीचे दर पोचले सहा हजारांवरनागपूर ः तूरीच्या दरात अचानक तेजी नोंदविण्यात आली...
कोल्हापुरात वांगी, टोमॅटोच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत वांगी, टोमॅटो,...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूला उठावसोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
पुण्यात टोमॅटो, शेवग्याच्या दरात वाढपुणे   ः गुलटेकडी येथील पुणे कृषी...
हिंगोलीत हळद प्रतिक्विंटल ५००० ते ६०००...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
लॉकडाउन शिथिलतेनंतर विदर्भात केळी दर...नागपूर ः लॉकडाउनपूर्वी ३०० ते ३७५ रुपये असा दर...
बाजरीची आवक घटली, दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील बाजार समित्यांमध्ये बाजरीची...
राज्यात मिरची १५०० ते ५००० रुपये...सांगलीत प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये सांगली ः...
जळगावात गवार ३२०० ते ४६०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढ, दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
औरंगाबादेत लिंबूच्या दरात किंचित सुधारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरचीला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत दहा ट्रकने...पुणे ः कोरोना टाळेबंदीनंतर सुरू झालेल्या पुणे...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १००० ते ३२००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत जांभूळ ८००० ते १२००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
पुण्यातील फूलबाजारात फुलांची अत्यल्प आवकपुणे : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन...