कृषी विभागाच्या क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरला सर्वसाधारण विजेतेपद

क्रीडा स्पर्धा
क्रीडा स्पर्धा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या तीन दिवसांपासून येथे सुरू असलेल्या कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. क्रिकेट, कबड्डी या खेळांत कोल्हापूरच्या पुरुष संघाने वर्चस्व राखले. 

व्हॉलिबॉलमध्ये पुरुषांच्या गटात सोलापूरने विजेतेपद पटकाविले. खो-खोमध्ये पुरुष विभागात साताऱ्याने तर महिला विभागात पुण्याने अजिंक्‍यपद पटकाविले. कबड्डीमध्ये ठाण्याचा महिला संघ विजेता ठरला. रिले क्रीडा प्रकारात नगर विजयी ठरले. ३४ जिल्ह्यांतील विविध वैयक्तिक खेळांमध्ये ८० खेळाडूंनी यश मिळविले. गेल्या तीन दिवसांपासून येथील पोलिस परेड मैदानावर जल्लोषी वातावरणात या स्पर्धा सुरू होत्या. या मैदानावरील विविध भागात, सांघिक व वैयक्तिक सामने झाले. विशेष करून सांघिक खेळांना जोरदार प्रतिसाद मिळाला. प्राथमिक फेरीनंतर जसे संघ अंतिम फेरीत जातील तसा उत्साह वाढत होता. 

रविवारी (ता. १३) सकाळी उपांत्य तसेच अंतिम फेरीचे सामने सुरू झाल्यानंतर जोश टिपेला जाऊ लागला. जस जशा स्पर्धा होऊन विजेते संघ निश्‍चित होतील तसा जल्लोष वाढला. प्रत्येक सामन्यानंतर वाद्य व नृत्याच्या गजरात कृषी विभागाच्या खेळाडूंनी आपले यश साजरे केले. 

राज्यभरातील कृषीच्या खेळाडूंनी चपळाईचे प्रदर्शन दाखवत वैयक्तिक क्रीडा प्रकारात आपले कौशल्य दाखविले. नगर, अमरावती, रत्नागिरी, कोल्हापूर येथील खेळाडूंनी वैयक्तिक क्रीडा प्रकारातही बाजी मारली. गोळाफेक, बुद्धिबळ, लांब उडी, टेबल टेनिस, बॅडमिंटन स्पर्धात  राज्यभरातील पुुरुष व महिला स्पर्धकांनी चुणूक दाखविली. स्पर्धेच्या आयोजनासाठी विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे, अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, अतुल जाधव, संतोष पाटील आदिसह जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

कठोर सराव आणि यशाने आनंदले ‘कृषी’चे खेळाडू  या स्पर्धेच्या तयारीसाठी राज्यभरातील सुमारे दोन हजार खेळाडू गेल्या महिन्यापेक्षा अधिक काळ कामाच्या वेळा सांभाळून सराव करीत होते. यामुळे प्रत्येक क्रीडा प्रकारात मोठी चुरस निर्माण झाली. खेळ संपेपर्यंत संघांनी दाखविलेली झुंज व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील खेळाडूंना सामन्याच्या ठिकाणी उपस्थित राहून दिलेले प्रोत्साहन कृषी विभागाच्या खेळाडूंचे मनोधैर्य वाढविणारे ठरले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com