मेहनती, अभ्यासू उद्योजक राज्याने गमावला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मेहनती, अभ्यासू उद्योजक राज्याने गमावला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मेहनती, अभ्यासू उद्योजक राज्याने गमावला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ‘‘काकासाहेब चितळे यांनी केवळ व्यवसाय केला नाही तर दुग्ध उत्पादन कसे वाढेल तसेच चांगल्या गाई व म्हशींच्या प्रजाती कशा निर्माण होतील यासाठी संशोधनावर भर दिला. त्यांच्या निधनाने दूरदृष्टी असलेला मेहनती व अभ्यासू उद्योजक राज्याने गमावला,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी वडील बाबासाहेब चितळे व भावंडा सोबत चितळे उद्योग समूहामध्ये कार्यरत राहणे पसंत केले. जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन, भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे 27 वर्षांपासून अध्यक्ष, भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त व संचालक,मुंबई माताबाल संगोपन केंद्राचे आश्रयदाते, विवेकानंद नेत्र चिकित्सालय, लायन्स नँबचे आश्रयदाते अशा विविध संस्थाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे.

दुग्ध उत्पादन आणि प्रक्रीया क्षेत्रात उद्योग उभारू इच्छिणाऱ्या अनेक नव उद्योजकांसाठी चितळे यांच्या उद्योगाची भरभराट ही नेहमीच प्रेरणादायी ठरलेली आहे. काकासाहेबांना विनम्र श्रद्धांजली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com