राज्यातील बाजार समित्या लॉकडाउनमध्ये सुरूच राहणार

राज्यात सुरू केलेल्या अंशतः लॉकडाउनमध्ये शेतीमाल वाहतूक आणि विक्री वगळण्यात आल्याने राज्यातील बाजार समित्या सुरूच राहणार आहेत, असे प्रशासन आणि पणन संचालनालयाद्वारे सांगण्यात आले आहे.
राज्यातील बाजार समित्या लॉकडाउनमध्ये सुरूच राहणार State Market Committees Will continue in lockdown
राज्यातील बाजार समित्या लॉकडाउनमध्ये सुरूच राहणार State Market Committees Will continue in lockdown

पुणे : राज्यात सुरू केलेल्या अंशतः लॉकडाउनमध्ये शेतीमाल वाहतूक आणि विक्री वगळण्यात आल्याने राज्यातील बाजार समित्या सुरूच राहणार आहेत, असे प्रशासन आणि पणन संचालनालयाद्वारे सांगण्यात आले आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे बाजार समित्यांमधील गर्दी नियंत्रणाचे नियोजन करून बाजार समित्या सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुट्टीच्या दिवशी संपूर्णतः संचारबंदी असल्याने बाजार समित्या सुरू ठेवायच्या की नाही या बाबत बाजार समिती घटकांमध्ये संभ्रमावस्था होती.

संचारबंदी असल्यामुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडणार नसल्याने भाजीपाल्याला उठाव होणार नाही, यामुळे बाजार समिती सुरू ठेवून काय करणार, असा प्रश्‍न बाजार घटकांमध्ये होता. मात्र नव्या नियमावलीनुसार फळे, भाजीपाला विक्री सुरू राहणार असल्याने बाजार समित्या देखील सुरू राहणार आहेत. ‘ब्रेक द चेन’च्या नव्या आदेशामध्ये देखील नवीन काही अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये फळांचा देखील समावेश करण्यात आल्याने आता फळे विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. या बाबत पुणे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड म्हणाले, ‘‘फळे भाजीपाला अत्यावश्‍यक सेवेत असल्याने बाजार समित्या सुरू ठेवण्यात येणार आहेत.

तसेच बाजार समित्या बंद ठेवण्याचे कोणतेही आदेश नाहीत आणि ‘ब्रेक द चेन’च्या नव्या आदेशामध्ये फळ विक्रीचा स्पष्ट उल्लेख असल्याने बाजार समिती बंद ठेवण्यात येणार नाही. बाजार समितीमधील गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांसह बाजार समितीचे सुरक्षा रक्षक, कर्मचारी अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती केली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या सर्व खबरदारी घेत बाजार समिती सुरू ठेवण्यात येणार आहे.’’

शहरातील दुकाने बंद  पुणे शहर आणि जिल्ह्यातील अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने प्रशासनाने बंद केली होती. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील वर्दळ कमी झाली होती. शहरात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुकाने बंद करायला लावली. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांची तारांबळ उडाली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com