Agriculture news in marathi State Market Committees Will continue in lockdown | Page 2 ||| Agrowon

राज्यातील बाजार समित्या लॉकडाउनमध्ये सुरूच राहणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 एप्रिल 2021

राज्यात सुरू केलेल्या अंशतः लॉकडाउनमध्ये शेतीमाल वाहतूक आणि विक्री वगळण्यात आल्याने राज्यातील बाजार समित्या सुरूच राहणार आहेत, असे प्रशासन आणि पणन संचालनालयाद्वारे सांगण्यात आले आहे.

पुणे : राज्यात सुरू केलेल्या अंशतः लॉकडाउनमध्ये शेतीमाल वाहतूक आणि विक्री वगळण्यात आल्याने राज्यातील बाजार समित्या सुरूच राहणार आहेत, असे प्रशासन आणि पणन संचालनालयाद्वारे सांगण्यात आले आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे बाजार समित्यांमधील गर्दी नियंत्रणाचे नियोजन करून बाजार समित्या सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुट्टीच्या दिवशी संपूर्णतः संचारबंदी असल्याने बाजार समित्या सुरू ठेवायच्या की नाही या बाबत बाजार समिती घटकांमध्ये संभ्रमावस्था होती.

संचारबंदी असल्यामुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडणार नसल्याने भाजीपाल्याला उठाव होणार नाही, यामुळे बाजार समिती सुरू ठेवून काय करणार, असा प्रश्‍न बाजार घटकांमध्ये होता. मात्र नव्या नियमावलीनुसार फळे, भाजीपाला विक्री सुरू राहणार असल्याने बाजार समित्या देखील सुरू राहणार आहेत. ‘ब्रेक द चेन’च्या नव्या आदेशामध्ये देखील नवीन काही अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये फळांचा देखील समावेश करण्यात आल्याने आता फळे विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. या बाबत पुणे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड म्हणाले, ‘‘फळे भाजीपाला अत्यावश्‍यक सेवेत असल्याने बाजार समित्या सुरू ठेवण्यात येणार आहेत.

तसेच बाजार समित्या बंद ठेवण्याचे कोणतेही आदेश नाहीत आणि ‘ब्रेक द चेन’च्या नव्या आदेशामध्ये फळ विक्रीचा स्पष्ट उल्लेख असल्याने बाजार समिती बंद ठेवण्यात येणार नाही. बाजार समितीमधील गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांसह बाजार समितीचे सुरक्षा रक्षक, कर्मचारी अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती केली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या सर्व खबरदारी घेत बाजार समिती सुरू ठेवण्यात येणार आहे.’’

शहरातील दुकाने बंद 
पुणे शहर आणि जिल्ह्यातील अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने प्रशासनाने बंद केली होती. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील वर्दळ कमी झाली होती. शहरात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुकाने बंद करायला लावली. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांची तारांबळ उडाली.
 


इतर अॅग्रो विशेष
‘महाडीबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी...पुणे ः राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर...
साहेब, टरबूज विक्रीला परवानगी द्या अकोला ः दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
अन्न प्रक्रियेमध्ये अवरक्त किरणांचा वापरअन्न प्रक्रियेदरम्यान पारंपरिक उष्णतेच्या...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...