agriculture news in marathi State meeting tommorow regarding lockdown | Agrowon

राज्यातील लॉकडाउनबाबत उद्या बैठक

टीम अॅग्रोवन
रविवार, 31 मे 2020

केंद्र सरकारने पाचव्या लॉकडाउनचे निकष कोणते ते ठरवण्याचे अधिकार राज्याला दिले असल्याने आता कटेनमेंट झोन कोणते हे ठरवण्याबाबत उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रशासनाशी सविस्तर चर्चा करणार आहेत.

मुंबई : केंद्र सरकारने पाचव्या लॉकडाउनचे निकष कोणते ते ठरवण्याचे अधिकार राज्याला दिले असल्याने आता कटेनमेंट झोन कोणते हे ठरवण्याबाबत उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रशासनाशी सविस्तर चर्चा करणार आहेत. मुंबईत एकेका इमारतीत रुग्ण असल्याने तो तो भाग कटेनमेंट एरिया करायचा की कसे, हा मोठाच मुद्दा असून पुणे येथेही झोपडीतील फैलाव लक्षात घेता हा निर्णय घ्यावा लागेल.

पाचवा लॉकडाउन हा कटेनमेंट-नॉन कटेनमेंट या एकाच निकषावर ठरणार आहे. मुंबई सुरू झाली तरच देशाचे चक्र सुरु होईल, हे लक्षात घेत अत्यंत सावध पावले टाकली जाणार आहेत. व्यवहार सुरू करण्याची घाई करून उपयोग नाही असे ठाकरे यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. मुंबईतील लोकल सुरु करण्यावर खल करणे गरजेचे मानले जाते आहे.

जीवनावश्यक सेवांसाठी गाड्या सुरू कराव्यात अशी विनंती आहे, ती प्रत्यक्षात आणणे कसे शक्य होईल ते पाहिले जाईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या मोठी असल्याने रुग्णसुविधा किती आहेत हे लक्षात घेऊन पावले टाकण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी मुंबईत १२ हजार खाटा तयार असून अतिदक्षता विभागाच्या सोयीही तयार आहेत.मात्र महाराष्ट्राचा निर्णय उद्या होईल असे नमूद केले.

मॉल उघडणे धोकादायक
केंद्र सरकारच्या सुचनेने मॉल उघडण्यास मुभा दिली असली तरी मुंबई-पुण्यात तसे करणे उचित नसल्याचे मत सरकारमधील सूत्रांनी व्यक्त केले आहे. त्यातच राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर गेल्या चार दिवसात प्रचंड वाढला आहे. १०० तासांत ४०० मृत्यू झाल्याची भयावह आकडेवारी समोर आल्याने कोणताही निर्णय घेणे कठीण ठरणार आहे. बरे होऊन घरी जाण्याचा दर वाढत असताना काहीसा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत असताना मृत्यूदर वाढणे ही समस्या ठरते आहे. 


इतर बातम्या
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
‘कृषी अधिकारीच म्हणतात, खतांसंदर्भात...पुणे ः शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासत आहे. कृषी...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...