agriculture news in marathi, State milk association faces Amul's challenge | Agrowon

राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे आव्हान
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 जून 2019

पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला विस्तार पाहून सहकारी व खासगी दूध प्रकल्पचालकांची चिंता वाढली आहे. ‘अमूल’ची घोडदौड कशी रोखावी याचा मार्ग आम्हाला सापडलेला नाही. त्यात पुन्हा डीलर कमिशन हीच एक मोठी डोकेदुखी बनली आहे, असा सूर या क्षेत्रातून उमटत आहे. 

गुजरातमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संघांनी स्थापन केलेला ‘अमूल’ हा डेअरी क्षेत्रातील सर्वांत मोठा कॉर्पोरट ब्रॅंड बनला आहे. अमूलची २०१८ मधील उलाढाल ३० हजार कोटींची होती. २०१९ मध्ये ती ३३ हजारांच्या पुढे गेली. यंदा उलाढाल ४० हजार कोटींपर्यंत नेण्याचे आक्रमक उद्दिष्ट अमूलने ठेवले आहे. 

पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला विस्तार पाहून सहकारी व खासगी दूध प्रकल्पचालकांची चिंता वाढली आहे. ‘अमूल’ची घोडदौड कशी रोखावी याचा मार्ग आम्हाला सापडलेला नाही. त्यात पुन्हा डीलर कमिशन हीच एक मोठी डोकेदुखी बनली आहे, असा सूर या क्षेत्रातून उमटत आहे. 

गुजरातमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संघांनी स्थापन केलेला ‘अमूल’ हा डेअरी क्षेत्रातील सर्वांत मोठा कॉर्पोरट ब्रॅंड बनला आहे. अमूलची २०१८ मधील उलाढाल ३० हजार कोटींची होती. २०१९ मध्ये ती ३३ हजारांच्या पुढे गेली. यंदा उलाढाल ४० हजार कोटींपर्यंत नेण्याचे आक्रमक उद्दिष्ट अमूलने ठेवले आहे. 

ग्राहकांकडून मिळवलेल्या एक रुपयांपैकी ८० पैसे शेतकऱ्यांना देण्याचे धोरण अमूलला सतत आघाडीवर ठेवते आहे. राज्यात अलीकडेच खरेदीदर दोन रुपयांनी वाढून प्रतिलिटर २७ रुपये करण्याचे धाडस अमूलने दाखविले. यातून दुधाची पळवापळवी वाढण्याची भीती राज्यातील डेअरीचालकांना वाटते. 

“अमूल, मदर डेअरी, पतंजली या ब्रॅंडकडून राज्यातील खासगी व सहकारी अशा दोन्ही डेअरींसमोर आव्हान उभे केले आहे. राजकीय पाठबळ मिळवून या कंपन्या राज्यात पाय पसरत आहेत. त्यात सर्वात जास्त धोका आम्हाला अमूलचा वाटतो. अमूलसमोर लहान डेअरीचालकांचा अजिबात टिकाव लागणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने हस्तक्षेप केला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया एका डेअरीचालकाने दिली. 

डेअरी तज्ज्ञ संजय भागवतकर म्हणाले की, “शेतकऱ्यांना अमूलने जादा दर देत राज्यात खळबळ उडवून दिली आहे. २९ सीएलआरचेच (करेक्टेडे लॅक्टोमीटर रिडिंग) दूध अमूल स्वीकारते. यात एसएनएफ ८.५ मिळतोच. संकलनात १०० टक्के शितकरण, उत्पादकांना वाढीव दर देण्याचे धोरण अमूलने ठेवले आहे. राज्यातील छोट्या डेअरीचालकांना अशी सर्व गुणवत्तापूर्ण स्पर्धा करणे परवडत नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.”

अमूलला टक्कर देता येणार नाही
‘गोकुळ, चितळे अशा काही निवडक डेअरींनी सतत बदलते स्वरूप ठेवत विश्वासार्हता ठेवली आहे. मात्र, बहुतेक ठिकाणी कमी गुणवत्तेचे दूध स्वीकारणे, पावडर टाकणे, शेतकऱ्यांना कमी दर देणे, डीलर कमिशन भरपूर ठेवल्याने पेच तयार झाला आहे. त्यामुळे या स्थितीत आपण अमूलशी टक्कर देऊ शकत नाही,’ असेही मत श्री. भागवतकर यांनी व्यक्त केले.

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...