agriculture news in marathi State Minister Bacchu kadu in action for low income families | Agrowon

पालकमंत्री बच्चू कडू राबविणार ‘चला चूल पेटवू’ सेवाअभियान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी ‘चला चूल पेटवू’ या सेवा अभियानाची सुरुवात केली आहे. शनिवारी (ता. ११) महात्मा फुले जयंती,  मंगळवारी (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून कोणत्याही प्रकारचे उत्सवी स्वरूप टाळून हे अभियान केवळ सेवा कार्यातून राबवावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी ‘चला चूल पेटवू’ या सेवा अभियानाची सुरुवात केली आहे. शनिवारी (ता. ११) महात्मा फुले जयंती,  मंगळवारी (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून कोणत्याही प्रकारचे उत्सवी स्वरूप टाळून हे अभियान केवळ सेवा कार्यातून राबवावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊनमुळे गोरगरिबांची सेवा करावी असे कडू यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यासाठी समाजातील सेवाभावी कार्यकर्त्यांनी घरी राहून आपल्या जवळपासच्या गरीब कुटुंबांना गरजूंना शिजवलेले अन्न किंवा ते शक्य नसेल तर अन्न धान्य द्यावे. किमान २०० ते ५०० रुपये देऊन आर्थिक मदत करावी. ही सेवा केवळ स्वतः च्या खर्चातून करावयाची आहे. त्यासाठी कोणीही एकत्र येण्याची गरज नाही. कोणाकडून वर्गणी गोळा करण्याची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

केलेल्या सेवेची माहिती ७३५००८७२२७ या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन त्यांनी म्हटले आहे. जे कार्यकर्ते उत्कृष्ट सेवा करतील त्यांना सर्वोत्तम कोरोनामुक्त कार्यकर्ता म्हणून घोषित केले जाईल, असेही ते म्हणाले.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...