agriculture news in marathi, state Minister Dilip kamble assures to change the norms of well scheme | Page 2 ||| Agrowon

‘विहिरीसाठी असलेली अट १ एकरवरून अर्धा एकर करणार’

टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 एप्रिल 2018

कोल्हापूर : सामाजिक न्याय विभागाकडे असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गंत विहिरीसाठी असलेली किमान १ एकर क्षेत्राची अट शिथिल करून ती अर्धा एकर करण्याचा शासनाचा विचार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी (ता.१) येथे दिली. 

कोल्हापूर : सामाजिक न्याय विभागाकडे असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गंत विहिरीसाठी असलेली किमान १ एकर क्षेत्राची अट शिथिल करून ती अर्धा एकर करण्याचा शासनाचा विचार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी (ता.१) येथे दिली. 

सामाजिक न्याय विभागाकडील योजनाचा आढावा घेण्यासाठी सर्किट हाउस येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. श्री कांबळे म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गंत विहिरीसाठी सध्या लाभार्थीची किमान १ एकर क्षेत्राची अट आहे, त्यामुळे १ एकरापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकरी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही, ही बाब विचार घेऊन या योजनेसाठी किमान १ एकर क्षेत्राची असलेली अट शिथिल करून ती अर्धा एकर करण्याचा शासनाचा विचार आहे. मात्र ज्यांचे क्षेत्र १ एकरापेक्षा जास्त आहे, त्यांनाही या योजनेत प्राधान्य राहील, असे श्री. कांबळे यांनी या वेळी स्पष्ट केले.

सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी दुधाळ जनावरे व  शेळी गट पालनाची योजना असून या योजनेंतर्गत सध्या १० शेळ्यांच्या गटासाठी अनुदान दिले जाते, ही मर्यादा वाढवून ती आता २० शेळ्याच्या गटासाठी अनुदान देणाचा शासनाचा प्रयत्न राहील, असे त्यांनी या वेळी सांगितले. बैठकीस समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार सुनील शेरखाने, तसेच समाजकल्याण विभागाचे निरीक्षक संजय पवार उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
प्लॅस्टिकच्या सूक्ष्मकणांचे खेकड्यांवर...सागरी किनाऱ्यावरील वाळूतील प्रौढ खेकड्यांच्या...
वस्तू खरेदीची बिले पंचायत समित्यांना...पुणे  : जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभ...
जैवविविधता नोंदणीसाठी धावपळपुणे: राज्यातील खेडोपाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
नगर जिल्ह्यात कांदा दरात चढउतार; शेतकरी...नगर  ः जिल्ह्यात मागील महिन्यात कांद्याला...
नांदेड, परभणी, हिंगोलीत साडेबारा लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
सातारा जिल्ह्यातील शेतकरी सौर...सातारा  : महावितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या...
मूर्तिजापूरमध्ये कृषी अधिकारी पोचले...अकोला  ः शेतकरी विविध प्रकारची पिके घेऊन...
औरंगाबाद जिल्ह्यात शेती आधारित उद्योग,...औरंगाबाद  : जिल्ह्याचा पालकमंत्री व...
नाशिक जिल्ह्यात रब्बीची एक लाख १५ हजार...नाशिक  : जिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण १ लाख...
यवतमाळमध्ये ‘आधार’अभावी थकले कापूस...यवतमाळ  ः कापूस चुकाऱ्यासाठी बॅंक खाते आधार...
जळगाव जिल्ह्यात युरियाचा साठा संपला !जळगाव  ः खतांच्या वापरात आघाडीवर असलेल्या...
राजापुरात पावणेदोनशे क्विंटल भात खरेदीराजापूर, जि. रत्नागिरी  ः राजापूर तालुका...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लवकरच...पुणे  ः माथाडी आणि कामगार कायदा गुंतागुंतीचा...
नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?नगर ः नगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागांत उशिरा...
धरण कालवा सल्लागार समितीची आज नगरला बैठकनगर  : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या...
परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूरपरभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...
सिंचन सुविधा बळकटीकरणावर भर देणार :...चंद्रपूर   ः ‘‘शेतकऱ्यांच्या जीवनात...