राज्यात कांदा प्रतिक्विंटल ३०० ते १७०० रुपये

राज्यात कांदा प्रतिक्विंटल ३०० ते १७०० रुपये
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ३०० ते १७०० रुपये

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ३०० ते १४०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ६) कांद्याची ५६५ क्‍विंटल आवक झाली. या कांद्याला ३०० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये २ मे रोजी ८४४ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला ४०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६ मे रोजी ५७९ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ४०० ते ९५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११ मे रोजी १०२४ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला ४०० ते १००० रुपये  प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १६ मे रोजी ६९३ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर २०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २२ मे रोजी ३९० क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला ३०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २५ मे रोजी ५४० क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ३०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २९ मे रोजी ५६४ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला २०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १ जूनला कांद्याची आवक ३८५ क्‍विंटल, तर दर ३०० ते ११०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ४ जूनला ३१९ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला ३५० ते १२५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

पुण्यात प्रतिक्विंटल १००० ते १४०० रुपये पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ६) कांद्याची सुमारे ७५ ट्रक आवक झाली होती. या वेळी दहा किलोला १०० ते १४० रुपये दर होते. पावसाळ्याचा अगोदर विविध राज्यांमधून मागणी वाढत असल्याने कांद्याच्या दरात थोडी वाढ होण्यास सुरवात झाली आहे. कांदा काढणीनंतर काही प्रमाणात कांदा शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवला असून, काही प्रमाणात विक्रीसाठी आणत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील कांद्याची आवक संतुलित राहिली असल्याचे ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी सांगितले. पुढील काही दिवसांत कांद्याचे दर वाढण्याचा अंदाजदेखील भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. गेल्या तीन दिवसांतील आवक (क्विंटल) आणि दर पुढीलप्रमाणे

अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये अकोला ः येथील बाजारात सध्या कांद्याच्या दरामध्ये तेजी आली आहे. कांदे प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाले. किरकोळ बाजारात कांदा २० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. येथील बाजारात सध्या अकोला जिल्ह्यातून दररोज २५ ते ३० टन कांद्याची आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.  येथील बाजारात कांद्याच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुनतेत २०० ते ३०० रुपयांनी दर सुधारले आहेत. दुय्यम दर्जाचा कांदा अधिक प्रमाणात येत असल्याने चांगल्या कांद्याला सर्रास १००० ते १२०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर दुय्यम प्रतीचा कांदा ६०० ते ९०० रुपयांदरम्यान विकत आहे. येत्या काळात कांद्याच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता तूर्त तरी नसल्याचा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त केला.

सांगलीत प्रतिक्विंटल २०० ते १३०० रुपये सांगली ः येथील विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची आवक कमी अधिक प्रमाणात होत असून, कांद्याचे दर स्थिर आहेत. गुरुवारी (ता. ६) कांद्याची ७२५ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २०० ते १३००, तर सरासरी ७०० रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.बाजार आवारात सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांतून कांद्याची आवक होते. गुरुवारी (ता. ३०) कांद्याची ५९७५ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २०० ते १५००, तर सरासरी ८५० रुपये असा दर मिळाला. शुक्रवारी (ता. ३१) १९७१ क्विंटल आवक झालेल्य असून, त्यास प्रतिक्विंटल २०० ते १४००, तर सरासरी ८५० रुपये असा दर मिळाला. शनिवारी कांद्याची २१७३ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २०० ते १५००, तर सरासरी ८७५ रुपये असा दर मिळाला. सोमवारी ३६७७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २०० ते १३०० रुपये दर मिळाले.

जळगावात प्रतिक्विंटल ४५० ते १२०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक महिनाभरापासून रखडत सुरू आहे. दर आठवड्यात सोमवारी व शनिवारी आवक अधिक असते. चार दिवस आवक कमी असते. गुरुवारी (ता. ६) १२०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्यात ४५० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक जळगाव, धुळे, यावल, पाचोरा आदी भागांतून होत आहे. मागील तीन आठवड्यांपासून दरात चढउतार सुरू असल्याची माहिती मिळाली. दर्जेदार कांद्यास मात्र मागील दोन आठवडे एक हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर मिळाले आहेत. 

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ४२५ ते १३०० रुपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ४) कांद्याची आवक ७१९१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ४२५ ते कमाल १३०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ९०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. सोमवारी (ता. ३) कांद्याची आवक ६१७८ क्विंटल झाली. त्यास ३०० ते १३०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ८७५ मिळाला. शनिवारी (ता. १) कांद्याची आवक ४८९६ क्विंटल झाली. त्यास ३२५ ते १२७५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ९०० होते. शुक्रवारी (ता. ३१) कांद्याची आवक ३५३९ क्विंटल झाली. त्यास ३५१ ते १३५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ९२५ होते. गुरुवारी (ता. ३०) कांद्याची आवक ३८९४ क्विंटल झाली. त्यास ३५० ते १३०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ९०० होते. मागील आठवड्यापासून बाजार समितीत आवक वाढली असून, बाजारभाव टिकून आहेत. रविवारी (ता. २) व रमजान ईदनिमित्त (ता. ५) कांद्याचे मार्केट बंद ठेवण्यात आले होते.

परभणीत प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ६) कांद्याचे दर प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. येथील मार्केटमध्ये आठवड्यातील दर शनिवारी कांद्याची आवक होत असते. सध्या स्थानिक परिसरातून तसेच नाशिक जिल्ह्यातील येवला, मनमाड या भागांतून कांद्याची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक शनिवारी ७०० ते १००० क्विंटल कांद्याची आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ६) घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये होते. तर किरकोळ विक्री १५ ते २० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी अब्दुल सलाम अब्दुल गफ्फार यांनी सांगितले.

सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १७०० रुपये सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याच्या दरात सुधारणा झाली. कांद्याची आवक मात्र तुलनेने कमीच राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १७०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची रोज १० ते ३० गाड्यांपर्यंत आवक राहिली. गेल्या वर्षभरापासून साधारण कांद्याचे दर हे नीचांकी पातळीवर आहेत. १०० रुपये ते ७०० रुपये या दरम्यानच कांद्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत राहिला. पण गेल्या आठवड्यात त्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली. मुळात कांद्याची आवकही कमीच राहिली. जिल्ह्यातील कांद्याची आवक तुलनेने कमी, पण बाहेरील आवक जास्त राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही आवक जेमतेम २० ते ३० गाड्यांपर्यंत होती. दर किमान १०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपयांपर्यंत पोचला. तर त्या आधी मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात हाच दर किमान २०० रुपये, सरासरी ७५० रुपये आणि सर्वाधिक ८०० रुपये असा राहिला. आवक मात्र जैसे थे १० ते ३० गाड्या अशीच राहिली. पण या सप्ताहात आवक काहीशी कमी असली, तरी दरात मा पुन्हा लक्षणीय सुधारणा झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १७०० रुपये असा दर मिळाला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com