अमरावती, नंदूरबार वगळता राज्य बर्ड फ्लूमुक्तीच्या दिशेने 

प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे आता अमरावती आणि नंदूरबार वगळता राज्य बर्ड फ्लूमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
Brid Flu
Brid Flu

पुणे ः बर्ड फ्लूची लागण, फैलावामुळे आडचणीत आलेला पोल्ट्री उद्योग आणि शेतकरी सावरत आहेत. प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे आता अमरावती आणि नंदूरबार वगळता राज्य बर्ड फ्लूमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. विविध जिल्‍ह्यांमधील पक्ष्यांच्या अचानक मृत्यूचे प्रमाण आणि त्याच्या भोपाळच्या प्रयोगशाळेमधून होणाऱ्या चाचण्या आता निगेटिव्ह येऊ लागल्या आहेत. 

याबाबत पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी माहिती दिली. डॉ. परकाळे म्हणाले, की अमरावती आणि नंदूरबार वगळता आता विविध जिल्ह्यांमध्ये विविध पक्षी जसे बगळे, कावळे, चिमण्या यांचे अचानक आणि मोठ्या संख्येने मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. तर त्यांच्या मृत्यूच्या चाचण्या देखील आता भोपाळ येथून निगेटिव्ह येत आहेत. गेल्या दोन महिन्यांत विविध पक्ष्यांसह कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण आणि चाचण्या बर्ड फ्लूच्या लागणीचे अहवाल सकारात्मक येत होते. यामध्ये पोल्ट्री उद्योग आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 

मात्र नंदूरबार आणि अमरावती जिल्ह्यांत ही साथ आटोक्यात आली असली, तरी कोंबड्यांच्या अकस्मात मृत्यूच्या घटना घडत आहेत. या दोन जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सुमारे ९ लाख कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. या दोन जिल्‍ह्यांतील पोल्ट्री उभारणीचे प्रमाण पाणवठ्यांलगत असल्याचा निष्‍कर्ष पशुसंवर्धन विभागाने काढला आहे. यामुळे स्थलांतरित पक्षी पाणवठ्यावर येत असल्याने त्यांच्या द्वारे फैलाव वाढत आहे. तरी या दोन जिल्ह्यांतील साथ आटोक्यात आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.  प्रतिक्रिया राज्यातील बहुतेक जिल्हे आता बर्ड फ्लूमुक्त झाले आहेत. अमरावती आणि नंदूरबार जिल्ह्यांत साथ आटोक्यात जरी आली असली तरी कोंबड्यांच्या अचानक मृत्यूच्या घटना घडत आहेत. स्थलांतरित पक्षी आता परतत असून, जाताना काही पाणवठ्यांवर येत आहेत. त्यामुळे फैलाव होतो आहे. हे टाळण्यासाठी पोल्ट्रीचालकांनी आपले पक्षी पाळीव प्राणी, स्थलांतरित पक्ष्यांच्या संपर्कात न येण्याची खबरदारी घ्यावी.  - डॉ. धनंजय परकाळे, अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन विभाग  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com