राज्यात वाटाणा ९०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल

In the State, peas are Rs 900 to 3500 per quintal
In the State, peas are Rs 900 to 3500 per quintal

अकोल्यात प्रतिक्विंटल ९०० ते १५०० रुपये अकोला ः येथील बाजारात वाटाण्याला मागील काही दिवसांपासून जेमतेम दर मिळत आहेत. उत्कृष्ट दर्जाचा माल ९०० ते १५०० रुपये दरम्यान प्रतिक्विंटल विकला जात आहे. तर दुय्यम दर्जाच्या मालाला ७०० ते १००० दरम्यानचा भाव मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. अकोला बाजारपेठेत मध्य प्रदेशासह राज्यातून दररोज ७० ते ८० क्विंटलपेक्षा अधिक मालाची आवक आहे. बाजारात वाटाण्याच्या दरात सध्या दर कमी झालेले आहेत. आवक वाढल्याने दर कमी आहेत. दुय्यम दर्जाच्या वाटाण्याची विक्री ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दराने होत असतानाच उच्च दर्जाचा वाटाणा ९०० ते १५०० रुपये दराने विकत आहे. किरकोळ बाजारात वाटाणा २५ ते ४० रुपये प्रतिकिलोने विकल्या जात आहे. चांगल्या मालाची मागणी बाजारात टिकून आहे.

नगरमध्ये २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल  नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत वाटाण्याची ९९ क्विंटल आवक गुरुवारी (ता. २६) झाली. वाटाण्याला प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये व सरासरी २७५० रुपये दर मिळाला. वाटाण्याच्या आवकेत सतत चढउतार होत आहेत.  नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत नगरसह शेजारच्या जिल्ह्यातून वाटाण्याची आवक होत असते. १८ डिसेंबरला १५ क्विंटलची आवक होऊन २००० ते ३५०० रुपये व सरासरी ३००० हजार रुपये दर मिळाला. १५ डिसेंबरला १६ क्विंटलची आवक होऊन १५०० ते ३००० हजार व सरासरी २२५० रुपये दर मिळाला. १ डिसेंबरला २२ क्विंटलची आवक होऊन २००० ते ४००० हजार रुपये व सरासरी ३००० हजार रुपये दर मिळला. आवकेप्रमाणे दरातही चढउतार होत आहे, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

पुण्यात प्रतिक्विंटल २५०० ते ३२०० रुपये पुणे ः गुलटेकडी येथील छत्रपती कृषी उत्पन्न बाजार समितीत परराज्यातून वाटाण्याची आवक होत आहे. साधारणपणे पंचवीस ते तीस टेम्पोची आवक सुरू आहे. त्यामुळे वाटाण्याचे दर कायम आहेत. सध्या वाटाण्याचे दर प्रतिक्विंटल २५०० ते ३२०० रुपये दर सुरू आहेत. पुणे बाजार समितीत पुणे विभागातून सासवड, पारनेर या भागातून अत्यंत कमी आवक सुरू आहे. दररोज साधारणपणे या भागातून एक ते दोन टेम्पोची आवक होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  पंधरा दिवसांपूर्वी वाटण्याचे दर प्रतिक्विंटल ३५०० ते ४००० रुपये एवढे होते. पंधरा दिवसांपासून दरात काही प्रमाणात घट होऊन ते प्रतिकिलोचे दर २५ ते ३० एवढे झाले आहे. या विषयी बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले, की यंदा पावसामुळे वाटाणा पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे सध्या लोकलची आवक फारच कमी आहे. पुणे शहर व परिसरातून ग्राहकांची मागणी बऱ्यापैकी आहे. त्यामुळे येथील वाटाणा कमी पडत असल्याने परराज्यातून आवक होत आहे. सध्या जबलपूर, मध्यप्रदेश या भागांतून वाटाण्याची आवक सुरू आहे. दरवर्षी सासवड व पारनेर भागांतून वाटाण्याची आवक होत असते. परंतु चालू वर्षी अजूनही या भागातून वाटाणा जास्त येत नाही. त्यामुळे दर कायम आहे. पुढील महिन्यात सासवड व पारनेर यांसह काही भागांतून आवक सुरू झाल्यानंतर दरात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

जळगावात ११०० ते १९०० रुपये दर जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २६) वाटाण्याची २१ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ११०० ते १९०० रुपयांपर्यंत मिळाले. आवक जामनेर, औरंगाबादमधील सोयगाव, फुलंब्री, एरंडोल, नाशिक आदी भागांतून होत आहे. आवक मागील आठ ते दहा दिवसांत वाढली आहे. यामुळे दरात चढउतार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

परभणीत प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये  परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २६) वाटाण्याची २०० क्विंटल आवक झाली. वाटाण्याला प्रतिक्विंटलला १५०० ते २२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. येथील मार्केटमध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून मध्य प्रदेशातील जबलपूर येथून वाटाण्याची आवक होत आहे. या आठवड्यात आवेकत वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. १२) वाटण्याची ८० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले.  गुरुवारी (ता. १९) वाटण्याची १५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २६) वाटण्याची २०० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटलला १५०० ते २२०० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

सांगलीत प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये सांगली : येथील शिवाजी मंडईत गुरुवारी (ता. २६) वाटाण्याची आवक ७० ते ८० पोत्यांची (एक पोते ४० किलोचे) झाली असून त्यास प्रतिदहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंडईत मध्य प्रदेश, गुजरात, सातारा जिल्ह्यातील वडूज या भागातून वाटाण्याची आवक होते. बुधवारी (ता. २५) वाटाण्याची ८० ते ९० पोत्यांची आवक झाली होती. वाटण्यास प्रतिदहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता. २४) वाटाण्याची ६० ते ७० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस २८० ते ३२० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. २३) वाटाण्याची ६० ते ७० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस २८० ते ३२० रुपये असा दर मिळाला. रविवारी (ता. २२) वाटाण्याची ७० ते ८० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला. पुढील सप्ताहात वाटाण्याची आवक आणि दर स्थिर राहतील, अशी शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे.

साताऱ्यात प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये सातारा ः ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २६) वाटाण्याची ३६ क्विंटल आवक झाली असून वाटाण्यास क्विंटलला ३००० ते ३५०० असा दर मिळाला आहे. वाटाण्यास डिसेंबरच्या सुरूवातीपासून क्विंटलला २००० ते ४५०० या दरम्यान दर मिळाले’’, असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. खटाव, कोरेगाव, जावळी, सातारा या तालुक्यातून वाटाण्याची आवक होत आहे. गुरूवारी (ता. १५) ४५ क्विंटल आवक झाली असून क्विंटलला ३५०० ते ४५०० असा दर मिळाला आहे. १२ डिसेंबरला १६ क्विंटल आवक होऊन क्विंटलला ३००० ते ३५०० असा दर मिळाला आहे. वाटाण्याची ४५ ते ५० रुपयेप्रमाणे किरकोळ विक्री सुरू आहे.

कोल्हापुरात प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ओला वाटाण्याची पाचशे ते सहाशे पोती आवक होत आहे. ओला वाटण्यास दहा किलोस २५० ते ३०० रुपये इतका दर मिळत आहे. बाजार समितीत बहुतांशी करून बेळगाव सीमा भागातून ओला वाटाण्याची आवक होते. गेल्या काही दिवसांपासून ओल्या वाटाण्याची आवक स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मध्यंतरी पावसाळी हवामानामुळे आवक घटली. आता त्यात थोड्या प्रमाणात वाढ होत आहे, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com