Agriculture news in Marathi in the State R. R. Patil Smart Village Scheme | Agrowon

राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम योजना

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 जानेवारी 2020

मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येईल, असे ग्रामविकासमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी (ता. २३) सांगितले. या योजनेत तालुका स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना २० लाख रुपये, तसेच जिल्हा स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना ५० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येईल, असे ग्रामविकासमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी (ता. २३) सांगितले. या योजनेत तालुका स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना २० लाख रुपये, तसेच जिल्हा स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना ५० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राज्यात मोठी क्रांती घडविली होती. केंद्र शासनानेही या योजनेची दखल घेऊन देश स्तरावर स्वच्छता अभियान सुरू केले. आता त्यांच्या नावे स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत सादर करून मान्यतेनंतर राज्यात ही योजना राबविली जाईल, असेही ते म्हणाले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ग्रामविकास विभागाच्या सध्या सुरू असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेमध्ये व्यापक सुधारणा करणे आवश्यक आहेत. या सुधारणा करून ग्रामविकासाला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येईल. तसेच या योजनेतून सध्या असलेल्या पुरस्काराच्या रकमेतही वाढ करण्यात येईल. 

या योजनेत तालुका स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना १० लाखांऐवजी २० लाख रुपये देण्यात येतील. तसेच जिल्हा स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना ४० लाखांऐवजी ५० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल. मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता घेऊन राज्यात लवकरच ही सुधारित योजना सुरू करण्यात येईल, असे त्यांनी 
सांगितले. परिषदेत मंत्री मुश्रीफ यांनी ग्रामविकासच्या अनुषंगाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. वेगवेगळ्या विषयांवरील त्यांची मते समजून घेतली. गावातील शेवटच्या घटकाला न्याय मिळेल या दिशेने सर्वांनी एकत्रित सहभागातून व्यापक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार, उपसचिव श्री. शर्मा, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला आदी वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

ग्रामसडक योजनेचे उद्दिष्ट वाढविले
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यामधून राज्यात अजून साधारण २० हजार किलोमीटर रस्त्यांची कामे होणे बाकी आहेत. यात अजून नवीन उद्दिष्ट समाविष्ट करून राज्यात पुढील ५ वर्षांत गावांना जोडणारे सुमारे ३६ हजार किलोमीटरचे रस्ते तयार करण्याचे आम्ही निश्चित केले आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पात याला मान्यता मिळण्यासाठी मुख्यमंत्री व वित्त मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

  • पुरस्काराची रक्कम (रुपयांत) तालुकास्तरावर १० ऐवजी २० लाख
  • जिल्हास्तरावर ४० ऐवजी ५० लाख

इतर ताज्या घडामोडी
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...