Agriculture news in marathi state in The rain begins | Agrowon

राज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच 

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

पुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी (ता. २८) काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. दुपारनंतर ढगांची निर्मिती होऊन, जोरदार वारे, मेघगर्जनेसह वळीव स्वरुपाचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे गहू, हरभऱ्यासह, चारा पिके, फळबागांचे नुकसान होत आहे. रविवारी (ता. २९) दुपारनंतर नगर जिल्ह्यातील राहुरी, नेवासा, नगर तालुक्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली होती. बुलडाणा शहरात गारपीटसह पाऊस पडला, तर पुण्यातही पावसाने हजेरी लावली. 

पुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी (ता. २८) काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. दुपारनंतर ढगांची निर्मिती होऊन, जोरदार वारे, मेघगर्जनेसह वळीव स्वरुपाचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे गहू, हरभऱ्यासह, चारा पिके, फळबागांचे नुकसान होत आहे. रविवारी (ता. २९) दुपारनंतर नगर जिल्ह्यातील राहुरी, नेवासा, नगर तालुक्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली होती. बुलडाणा शहरात गारपीटसह पाऊस पडला, तर पुण्यातही पावसाने हजेरी लावली. 

जालना जिल्ह्यातील अंकूशनगर परिसरात शनिवारी (ता. २८) पावसाने जोरदार हजेरी लावली. महिन्याभरात चौथ्यांदा पडलेल्या पावसाने गहू, हरभरा, ज्वारी रब्बी पिकांचे नुकसान झाले, त्याचबरोबर फळबागांनाही वादळी पावसाचा फटका बसला. वडीगोद्री परिसरात झालेल्या पावसाने टरबूजाला तडाखा दिला असून, कांदा पिकांचेही नुकसान झाले आहे. 

पुणे शहर आणि जिल्ह्यात शनिवारी दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. काही ठिकाणी सुमारे तासभर पावसाच्या सरी सुरू होत्या. जोरदार वाऱ्यामुळे शहरात अनेक झाडे तुटली, तर सखल भागात पाणी साचले. पुणे शहर, हवेली तालुक्यासह जिल्हात विविध ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस पडला. यवतमाळमधील वणी, झरी झामणी, नेर तर चंद्रपूर येथील जेवती, कोर्पणा येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
जत तालुक्‍याच्या पूर्व भागात चारा टंचाईसांगली  ः पावसाने दिलेली दडी, वाया गेलेला...
अकोल्यात कंटेनमेंट झोन वाढणार नाहीत...अकोला  ः अकोल्यात कोरोना बाधितांची वाढत...
कर्नाटकी बेंदुरावर कोरोनाचे सावटकोल्हापूर:  कर्नाटकी बेंदूर उद्या (ता.७)...
अटींवरच शेतकऱ्यांना वर्ध्यात कापूस...वर्धा  ः वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या...
चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा हजारांवर ...चंद्रपूर ः शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची हमी राज्य...
शेतकऱ्यांना प्रतीक्षा फळपीक विमा...नगरः मृगबहारासाठी पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यातील गावांतील आठवडे बाजार...पुणे: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडीच...
माती परीक्षणानुसार करा खतांचे नियोजनमाती परीक्षण हा पीक उत्पादनाचा आत्मा आहे. आगामी...
सुधारित तंत्राने करा शेवगा लागवडलागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील अंतर २.५ ते ३...
भात पुर्नलागवडीची चारसूत्री पद्धतीसूत्र १  भातपिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व...
हिंगोलीत हळद ४८०० ते ५२०० रुपये...हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...