agriculture news in marathi, State receives premonsoon rain is some parts | Agrowon

राज्यात तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या सरी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 जून 2019

पुणे : मॉन्सून राज्यात दाखल होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी राहिला आहे. याअगोदरच राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत. दुपारपर्यंत उन्हाचा चटका असला, तरी दुपारनंतर हवामानात बदल होऊन अचानक ढगाळ हवामान होत तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या सरी बरसत आहेत. 

बुधवारी (ता.५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत नगरमधील कर्जत, जामखेड, नेवासा, बीड, लातूर येथे जोरदार वाऱ्यासह पावसाचा शिडकावा झाला. तर, जामखेडमधील हळगाव येथे छावणीतील जनावरांवर वीज पडून दोन जनावरे दगावली. 

पुणे : मॉन्सून राज्यात दाखल होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी राहिला आहे. याअगोदरच राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत. दुपारपर्यंत उन्हाचा चटका असला, तरी दुपारनंतर हवामानात बदल होऊन अचानक ढगाळ हवामान होत तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या सरी बरसत आहेत. 

बुधवारी (ता.५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत नगरमधील कर्जत, जामखेड, नेवासा, बीड, लातूर येथे जोरदार वाऱ्यासह पावसाचा शिडकावा झाला. तर, जामखेडमधील हळगाव येथे छावणीतील जनावरांवर वीज पडून दोन जनावरे दगावली. 

वातावरणातील बदलामुळे कमाल तापमानात घट होत आहे. मात्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उर्वरित राज्यात वाढत्या उकाड्यामुळे कमाल तापमान अजूनही कायम आहे. नागपूर ४६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.  

 विदर्भात काहीअंशी असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे सकाळपासून उन्हाचा चटका बसत आहे. या चटक्यामुळे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्यावर जात आहे. विदर्भातील अकोला, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातही उन्हाच्या झळा अजूनही तीव्रच आहे. यामुळे या भागात अजूनही कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. खान्देशात ४१ ते ४३ अंश सेल्सिअसदरम्यान तापमान आहे. तर, मध्य महाराष्ट्रात अंशतः असलेल्या ढगाळ हवामानामुळे किंचित घट झाली आहे. त्यामुळे या भागात कमाल तापमानाचा पारा ३० ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. तर, कोकणातील वातावरणात अंशतः बदल होत असल्याने कमाल तापमानात चढउतार सुरू आहे.   

बुधवारी (ता.५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३६.८ (१.५), जळगाव ४३.० (१.४), कोल्हापूर ३२.७ (-०.८), महाबळेश्‍वर ३०.१ (२.९), मालेगाव ४१.० (३.०), नाशिक ३७.१ (०.६), सांगली ३२.२ (-२.३) सातारा ३७.४ (३.३), सोलापूर ३७.० (-१.६), मुंबई (सांताक्रूझ) ३४.४ (१.०), मुंबई ३४.४ (०.७), अलिबाग ३५.१ (२.३), रत्नागिरी ३२.६ (०.२), डहाणू ३५.६ (१.६), औरंगाबाद ४१.८ (३.७), बीड ४२.५ (३.७), परभणी ४३.७ (३.२), नांदेड ४३.५ (२.९), उस्मानाबाद ४०.७ (३.३) अकोला ४५.० (३.९), अमरावती ४४.८ (३.९), बुलडाणा ४०.२ (२.८), ब्रह्मपुरी ४५.८ (४.०), चंद्रपूर ४३.२ (०.७), गोंदिया ४३.० (०.८), नागपूर ४६.४ (४.४), वाशीम ४३.०, वर्धा ४५.८ (४.२) यवतमाळ ४५.० (४.२).

इतर अॅग्रो विशेष
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...
कृषी निर्यातीला धोरणात्मक पाठबळ हवे :...जागतिक स्तरावर कृषी निर्यातीत भरपूर संधी आहे,...
शेतकऱ्यांसाठी निवडणुका फक्त...देशात असो किंवा राज्यात ज्या वर्षात निवडणुका...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
‘मिरॅकल बीन’चा लुप्त होतोय चमत्कारदोन दिवसांपासून ढगाने व्यापलेल्या आकाशाने...
स्वस्त थाळी शेतकऱ्यांना पडू शकते महागातशिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''...
नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरीरत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील...