agriculture news in marathi, State reports Central to Ban Pesticides not giving Antidote | Agrowon

विषावर उतारा नसलेल्या कीडनाशकांवर बंदी घाला
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 मे 2018

पुणे : यवतमाळ विषबाधा दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विषावर उतारा (ॲंटीडोट) नसलेल्या कीडनाशकांवर बंदी घालावी, असा लेखी प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला आहे. ॲंटीडोट नसलेल्या कीडनाशकामुळे विषबाधा झाल्यास शेतकऱ्याचा मृत्यू अोढावण्याच्या धोक्यात वाढ होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून घातक कीटनाशकांचा वापर आणि उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयातदेखील कृषी विभागाचे कान टोचले आहेत. 

पुणे : यवतमाळ विषबाधा दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विषावर उतारा (ॲंटीडोट) नसलेल्या कीडनाशकांवर बंदी घालावी, असा लेखी प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला आहे. ॲंटीडोट नसलेल्या कीडनाशकामुळे विषबाधा झाल्यास शेतकऱ्याचा मृत्यू अोढावण्याच्या धोक्यात वाढ होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून घातक कीटनाशकांचा वापर आणि उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयातदेखील कृषी विभागाचे कान टोचले आहेत. 

कीटकनाशक कायदा १९६८ आणि कीटकनाशके नियम १९७१ मधील कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन झाल्यानंतर राज्य कृषी विभागाला स्थिती पाहून फक्त दोन महिन्यांसाठी कीटकनाशकांवर बंदी घालता येते. बाजारात काही कीडनाशकांसाठी ‘ॲंटीडोट’ उपलब्ध नाहीत. अशा कीडकनाशकांची बाधा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रभावी उपचार करता येत नाहीत. यात केवळ लक्षणांच्या आधारे शेतकऱ्यांवर उपचार करावे लागतात. यामुळे त्याचा हकनाक बळी जाण्याची शक्यता वाढते, असे मत उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केले आहे. 

‘अॅंटीडोट’ नसलेल्या आणि केवळ लक्षणांच्या आधारे उपचार करण्याची शिफारस असलेल्या कीडकनाशकांवर कायमची बंदी घालण्याबाबत राज्य शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. राज्याच्या शिफारशीनुसार केंद्रीय कीटकनाशक मंडळाकडे तशी शिफारस करण्यात आलेली आहे. तथापि, मंडळाने अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. बाजारपेठेत निअोनिकोटीनाॅईडस गटातील काही कीटकनाशके उपलब्ध आहेत. त्यांच्या ‘ॲंटीडोट’चा शोध लागेपर्यंत केंद्राने त्यांच्या विक्रीची परवानगी नाकारावी, असेही राज्याचे म्हणणे आहे. 

केंद्रीय कीटकनाशक मंडळाकडून प्रतिसाद नाही 
महाराष्ट्रात कीटकनाशकामुळे शेतकरी बळीची मोठी दुर्घटना होऊनदेखील केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणीकरण समितीकडून (सीआयबीआरसी) कसलाच प्रतिसाद नसल्याचे दिसून येते. राज्य शासनाकडून पाठविलेल्या प्रस्तावांना उत्तर देण्याचे सौजन्य देखील मंडळाकडून दाखविले जात नाही. ‘ॲंटीडोट’ नसलेल्या घातक कीडनाशकांना मान्यता देण्याची जबाबदारी या संस्थेचीच असते. मात्र वेळीच योग्य पाऊले न उचलल्यास विषबाधा होण्याच्या समस्यांत वाढ होईल, अशी भीतीही एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केली. 

सचित्र माहिती पुरवावी 

  • कीडनाशक उत्पादनासोबत शेतकऱ्यांसाठी दिलेली माहिती स्पष्ट व वाचनीय नसते. 
  • विषबाधा झाल्यास तात्काळ काय पावले टाकावीत याची सचित्र माहिती हवी, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

इतर अॅग्रो विशेष
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
जमीन सुपीकता जपत दर्जेदार संत्रा...दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत...
केळीत दोन हंगामात कारले पिकाचा प्रयोगजळगाव जिल्ह्यातील करंज येथील रामदास परभत पाटील...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
लावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच...
खजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...