भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
बातम्या
‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढला
निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत ग्राहकांना रसायनांचा कमी अंश असलेल्या शेतीमालाची उपलब्धता व ओळख व्हावी याकरिता विविध पिकांच्या नेटवर नोंदणीला ‘अपेडा’कडून प्रोत्साहन दिले जात आहे.
नागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत ग्राहकांना रसायनांचा कमी अंश असलेल्या शेतीमालाची उपलब्धता व ओळख व्हावी याकरिता विविध पिकांच्या नेटवर नोंदणीला ‘अपेडा’कडून प्रोत्साहन दिले जात आहे. याला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पणन क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. देशात सुमारे ७५ हजार विविध पीकधारकांनी ‘अपेडा’च्या पोर्टलवर नोंदणी केली असून, त्यामध्ये सर्वाधिक ६० हजार शेतकरी हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
पीकपद्धतीच्या वेगळेपणाबाबत महाराष्ट्र आघाडीवर आहे. ऋतुमान सर्वच प्रकारच्या पिकाला पोषक ठरते. त्यामुळे स्ट्रॉबेरी, द्राक्ष, आंबा, केळी, पपई, संत्रा, लिंबू या पिकांखालील क्षेत्र महाराष्ट्रात विस्तारत आहे. फळपिकांच्या निर्यातीत त्यामुळेच राज्य देशपातळीवर आघाडीवर आहे. मात्र या साऱ्याचा एकत्रित डेटाबेस उपलब्ध नाही. तो उपलब्ध व्हावा याकरिता राज्य शासनाच्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी अपेडाच्या पीकनिहाय नोंदणी पोर्टलचा आधार घेतला जात आहे.
अपेडाने पीकनिहाय नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये डाळिंब, खाण्याचे पान, द्राक्ष, लिंबूवर्गीय पिके, भाजीपाला अशा घटकांचा समावेश आहे. या विविध पीकनिहाय नेटवर देशभरातून सुमारे ७५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ६० हजारांवर शेतकरी महाराष्ट्रातील आहेत.
प्रतिक्रिया
शेतकऱ्यांनी अपेडाच्या पोर्टलवर नोंदणी करावी याकरिता विविध कार्यशाळा घेण्यात आल्या. नागपुरातील वनामती येथे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या पुढाकाराने अशाप्रकारचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात इतर ठिकाणी देखील कार्यशाळा घेतल्या जातात. त्याच्याच परिणामी आजवर महाराष्ट्रातून सर्वाधिक ६० हजारांवर नोंदणी होऊ शकली. आम्ही दोन लाख शेतकऱ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- गोविंद हांडे, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार (निर्यात), राष्ट्रीय फलोत्पादन अभियान
- 1 of 1540
- ››