agriculture news in Marathi state should not ignore responsibility Maharashtra | Agrowon

राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र फडणवीस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून मदतीची ग्वाही दिली आहे. केंद्र सरकार तर मदत करणारच आहे, दरवेळेसच केंद्र सरकार मदत करते.

बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून मदतीची ग्वाही दिली आहे. केंद्र सरकार तर मदत करणारच आहे, दरवेळेसच केंद्र सरकार मदत करते. पण राज्य सरकारने आपली जबाबदारी झटकून टाकता कामा नये. पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे, राज्याने ती पार पाडत तातडीची मदत शेतकऱ्यांना द्यायला हवी, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कोर्टात मदतीचा चेंडू टोलवला. 

सोमवारी (ता.१९) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस बारामती तालुक्‍यातील उंडवडी येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्याने केंद्राच्या मदतीची वाट न पाहता तातडीची मदत द्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

‘‘प्रत्येक गोष्ट केंद्रावर टाकायची आणि आपण मात्र नामानिराळे व्हायच, आपले जणू काही कामच नाही, ही जी प्रवृत्ती आहे ती योग्य नाही. राज्याला राज्याची जबाबदारी घ्यावीच लागेल, ती झटकून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ ही मदत घोषित करावी,’’ अशी मागणी फडणवीस यांनी केली. 

श्री. फडणवीस म्हणाले, की मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना त्या काळात पावसाने झालेल्या नुकसानीनंतर दहा हजार कोटींचे पॅकेज राज्याच्या वतीने जाहीर केले होते. त्या वेळेसही केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्याच्या वतीने मदत सुरू करीत असल्याचे त्या वेळेस नमूद केले होते. या पूर्वीही जेव्हा आपत्ती येते तेव्हा केंद्राचे पथक येते, नुकसानीचा घोषवारा केंद्राला पाठवावा लागतो, त्या नंतरच ती मदत मिळते. 

‘‘शरद पवारसाहेब हे कृषिमंत्री होते, केंद्राकडून मदत कशी मिळते हे त्यांना माहिती आहे. मी निश्‍चित सांगतो केंद्र सरकार निश्‍चित मदत करणार आहे. सोईस्कर राजकीय भूमिका कोणत्याच नेत्यांनी घेऊ नये,’’ असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

प्रतिक्रिया
सरकारचा नाकर्तेपणा समोर येतो आहे. असंतोष तयार झाला आहे. असे असतानाही शरद पवार यांना सरकारच्या बाजूनेच भूमिका घ्यावी लागणार आहे. आमचा दौरा घोषित झाल्यानंतर अनेक पालकमंत्री आपापल्या मतदारसंघात गेले. 
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
गहू, ज्वारी पिकांवरील खोडमाशीचे...बहुतांश ठिकाणी गहू व ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे...
पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाणी...रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात लसूण ५००० ते १३००० रुपयेनाशिकमध्ये ६२०० ते ११५०० रुपये  नाशिक :...
उत्तम भाजीपाला उत्पादनासाठी पोषक हवामानवाटाणा वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...