Agriculture news in marathi, In the state, Sitafal is available at Rs 5000 to 4000 per quintal | Agrowon

राज्यात सीताफळ ५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

पुण्यात सीताफळ ५ ते १२० रुपये प्रतिकिलो

पुणे : यंदा पाऊस चांगला झाल्याने सीताफळाचा दुसरा हंगाम बहरला आहे. यामुळे बाजारातील आवक वाढली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ३१) सुमारे २० टन आवक झाली. या वेळी दर्जानुसार एका किलोला ५ ते १२० रुपये दर होते, अशी माहिती सीताफळाचे प्रमुख आडतदार युवराज काची यांनी दिली. 

पुण्यात सीताफळ ५ ते १२० रुपये प्रतिकिलो

पुणे : यंदा पाऊस चांगला झाल्याने सीताफळाचा दुसरा हंगाम बहरला आहे. यामुळे बाजारातील आवक वाढली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ३१) सुमारे २० टन आवक झाली. या वेळी दर्जानुसार एका किलोला ५ ते १२० रुपये दर होते, अशी माहिती सीताफळाचे प्रमुख आडतदार युवराज काची यांनी दिली. 

काची म्हणाले,"सीताफळाला तीन हंगामात फळे लागतात. यामध्ये जून ते सप्टेंबर, ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते फेब्रुवारी यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी कमी झालेला पाऊस आणि तीव्र उन्हाळ्यामुळे पहिल्या हंगामात कमी उत्पादन मिळाले. मात्र, यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे दुसऱ्या हंगामात चांगले उत्पादन सुरू आहे. ऑक्टोबर हिट सुरू झाल्यावर फळ परिपक्व होण्याचे प्रमाण वाढून आवक ३५ टनांपर्यंत वाढेल. दर स्थिर राहतील. तिसऱ्या हंगामात आवक कमी होऊन दर २०० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता राहील." सध्या बाजारात होणारी आवक साताऱ्यासह पुणे जिल्ह्यातील विविध भागांतून होत आहे.

सोलापुरात सर्वाधिक ४००० रुपये

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात सीतफळाला मागणी राहिली. पण त्यांचे दरही टिकून राहिले. सीताफळाला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४००० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात या सप्ताहात सीताफळाची आवक रोज २० ते ४० क्विंटलपर्यंत राहिली. सीताफळाला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला. सीताफळाची सर्व आवक पंढरपूर, मोहोळ, बार्शी या स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील जिल्ह्यातील आवक अगदीच नगण्य राहिली. 

या आधीच्या सप्ताहातही काहीशी अशीच आवक होती. प्रतिदिन ५० ते ७० क्विंटलपर्यंत ती होती. दर प्रतिक्विंटलला किमान ६५० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये दर मिळाला. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात हीच आवक ५० क्विंटलपर्यंत किमान होती आणि दर प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३८०० रुपये असा दर होता.

औरंगाबादमध्ये १५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ३१) सीताफळांची ३३ क्‍विंटल आवक झाली. त्यांना १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २४ ऑक्टोबरला ३३ क्विंटल आवक झालेल्या सीताफळाचे दर १५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २६ ऑक्टोबरला हीच आवक ६७ क्विंटल होती. त्या वेळी दर १५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. २७ ऑक्टोबर रोजी ५५ क्विंटल आवक झालेल्या सीताफळाला २५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. 

२८ ऑक्टोबर रोजी सीताफळाची आवक २८ क्विंटल झाली. त्या वेळी त्यांना १५०० ते ३००० रुपयांचा दर मिळाला. २९ ऑक्‍टोबर रोजी २५ क्विंटल आवक झालेल्या सीताफळाला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर, ३० ऑक्टोबरला २३ क्विंटल आवक झाली. त्या वेळी सीताफळाचे दर १५०० ते ४००० हजार रुपये प्रतिक्विंटल होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

अकोल्यात १००० ते ५००० रुपयांचा दर

 यंदाच्या पावसाचा फटका सीताफळ उत्पादन व दरालाही बसला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्धाच हंगाम हातात आला असताना दरही तुलनेने यंदा कमी मिळत आहेत. अकोला बाजारात सीताफळ   १००० रुपयांपासून ५००० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल विकले जात आहेत. दिवाळीपूर्वी हा दर चांगला होता. आता दरांमध्ये उतार आल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

अकोला बाजारात उच्च दर्जाची फळे प्रतिक्रेट ८०० ते ९०० रुपयांदरम्यान विकत आहेत. एका क्रेटमध्ये साधारणतः १८ ते १९ किलो फळे बसतात. मध्यम दर्जाची फळे ४०० ते ५०० रुपये प्रतिक्रेट आणि दुय्यम दर्जाची फळे १५० ते २५० रुपये क्रेट दराने विकली जात आहेत. बाजारात दररोज ३०० क्रेटपेक्षा अधिक आवक होत आहे. पावसाळी वातावरणामुळे सध्या तितकी मागणी नाही. याचाही दरांवर परिणाम झालेला असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते.

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० रुपये 

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.३०) सीताफळांची आवक ४० क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २२०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

मंगळवारी (ता.२९) सीताफळांची आवक ३० क्विंटल झाली. त्यांना १५०० ते ३५०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २२०० रूपये मिळाला. शनिवारी (ता. २६) हीच आवक ४८ क्विंटल झाली. त्यावेळी १५०० ते ३५०० रूपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २२०० रूपये मिळाला. 

शुक्रवारी (ता.२५) सीताफळांची आवक ३० क्विंटल झाली. त्यांना १५०० ते ३५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २२०० रूपये होता. गुरूवारी (ता.२४ ) आवक ५२ क्विंटल झाली. त्यावेळी १५०० ते ३८०० रूपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २४०० रूपये होते. 

मागील आठवड्यापासून बाजार समितीत सीताफळाची आवक सर्वसाधारण होती. चालू आठवड्यात आवक मंदावली असून त्यानुसार दरही सर्वसाधारण आहे. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे बाजारभावतही चढ उतार दिसून आला. रविवार (ता.२७) बाजार समितीचे कामकाज दिवाळीमुळे बंद होते. सोमवारी (ता.२८) बाजार समितीमध्ये सीताफळाची आवक झाली नाही. 

परभणीत १००० ते २५०० रुपये

परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ३१) सीताफळाची १२ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

गेल्या आठवड्यापासून येथील मार्केटमध्ये गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव, परभणी तालुक्यातील उजळंबा आदी गावांतील सीताफळांची आवक होत आहे. गुरुवारी (ता. ३१) सीताफळाची १२ क्विंटल (६० क्रेट) आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटलला १००० ते २५०० रुपये (२०० ते ५०० रुपये प्रतिक्रेट) दर मिळाले. किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ८० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी सय्यद इसा यांनी सांगितले.

इतर बाजारभाव बातम्या
दौंड बाजार समितीत ज्वारीला ४३०० रुपये दरदौंड, जि. पुणे : दौंड बाजार समितीमध्ये ज्वारीची...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३२५० ते ६२५०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
सोलापुरात टोमॅटो, वांग्याच्या दरात तेजीसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगाव बाजारात केळीची आवक रखडतजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक रखडतच सुरू असून,...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दरातही...नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत नव्या सोयाबीनची...
गुलटेकडीत फ्लॉवर, वांगी, गाजराच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ६१४ क्विंटल...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात किंमत...
औरंगाबादेत फ्लॉवर १४०० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग शेंग ३५०० ते ५००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा ५०० ते ६००० रूपये...सोलापुरात सर्वाधिक ६००० रुपये सोलापूर...
नाशिकमध्ये वांगी २५०० ते ४००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात कोथिंबिरीस प्रतिशेकडा २००० ते...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात कोथिंबीर, मेथीच्या भावात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
सीताफळ, मोसंबी, संत्रा, डाळिंबाचे दर...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात कांदा, शेवग्यासह पालेभाज्यांचे...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सांगलीत गूळ ३२०० ते ४३३० रुपये...सांगली : येथील बाजार समितीच्या आवारात गुळाची ३०५६...
परभणीत मेथीची पेंडी ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात सीताफळ ५०० ते ४००० रुपये...पुण्यात सीताफळ ५ ते १२० रुपये प्रतिकिलो पुणे...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...