एसटी महामंडळात ४ हजार ४१६ जागा

एसटी महामंडळात ४ हजार ४१६ जागा
एसटी महामंडळात ४ हजार ४१६ जागा

पुणे ः एसटी महामंडळात पुणे विभागासह राज्यातील १२ विभागांमध्ये मिळून ४ हजार ४१६ चालक, वाहकांची भरती होणार आहे. त्याकरिता येत्या ८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. विशेष म्हणजे एसटी महामंडळाने अर्ज भरल्यानंतर काही त्रुटी राहिल्यास अथवा दुरुस्ती करावयाची असल्यास त्यासाठी १२ ते १५ फेब्रुवारी २०१९ चा कालावधी दिला आहे.  या प्रक्रियेत पुणे विभाग (१६४७ जागा), सोलापूर विभाग (५९१). नाशिक विभाग (११२), जळगाव (२२३), धुळे विभाग (२६८), यवतमाळ विभाग (१७१), बुलडाणा (४७२), अकोला विभाग (३३), अमरावती (२३०), परभणी (२०३), जालना विभाग (२२६), औरंगाबाद (२४०) या विभागांमध्ये भरती होणार आहे. या जागांव्यतिरिक्त उमेदवार प्रतीक्षा यादीत राहिल्यास त्यांना औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबविल्या जाणार असलेल्या शहर वाहतूक योजनेसाठी १५ हजार रुपये एवढ्या ठोक रकमेवर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती स्वीकारण्याचा पर्याय राहणार आहे.  या भरतीकरिता उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा, त्याला मराठी भाषा लिहिता- वाचता येत असावी. आरटीओकडील अवजड वाहन चालविण्याचा परवाना व पीएसव्ही बॅज आवश्‍यक आहे. याकरिता खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय २४ ते ३८ वर्षे असावे, मागास प्रवर्गासाठी वयात ५ वर्षांची सवलत राहील. शारीरिक पात्रतेमध्ये उंची किमान १६० व कमाल १८० सेमी असावी. दृष्टी चष्माविरहीत असावी. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाकरिता ६०० रुपये व मागास तसेच दुष्काळी भागातील सर्व उमेदवारांकरिता ३०० रुपये शुल्क राहील. चालक, वाहकांसाठी १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित हे प्रत्येकी २५ गुणांसाठी असतील. परीक्षेचा कालावधी दीड तासांचा राहील. बारामतीच्या राष्ट्रवादी करिअर अकॅडमीचे समीर मुलाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भातील अधिक माहितीसाठी व अर्जासाठी www.msrtcexam.in व www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com