‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१ हजार

‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१ हजार
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१ हजार

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व वाहकांच्या आठ हजार २२ जागांची भरती निघाली आहे. त्यासाठी आतापर्यंत ४१ हजार ७१७ उमेदवारांनी अर्ज केले असून त्यामध्ये सोलापूरसह दुष्काळी जिल्ह्यांमधील सर्वाधिक उमेदवार आल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या विभागाकडून सांगण्यात आले. जागा भरतीच्या तुलनेत पाचपट अर्ज आल्याने राज्यात बेरोजगारी वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.  मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्टार्टअप इंडिया च्या माध्यमातून राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा झाली. परंतु, बॅंकांना ढिगभर कागदपत्रे देऊनही वेळेवर पाहिजे तेवढे कर्ज मिळत नाही. दुसरीकडे सोलापूरसह अन्य दुष्काळी जिल्ह्यांमध्ये नवे उद्योगही पुरेशा प्रमाणात आले नाहीत. मागील काही वर्षांपासून खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाणही घटल्याचे चित्र आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन विभागाच्या या भरतीसाठी अनुसूचित जमातीच्या ६८५ जागा आणि तीन हजार अर्ज आले आहेत. महिला उमेदवारांनी मात्र या भरतीकडे पाठ फिरविल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे समांतर आरक्षणानुसार त्या जागांवर पुरुष उमेदवारांना संधी मिळणार आहे. रिक्‍तपदांसाठी अर्ज करण्याची मुदत १५ ऐजवी २२ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. 

प्रकार जागा  अर्ज
एकूण जागा  ८,०२२ ४१,७१७ 
महिला राखीव २,४०६ ९५३
अनुसूचित जमाती जागा  ६८५ २,९७२

प्रतिक्रिया... राज्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. मागील नोकरी भरतीवेळी १५ हजार जागांसाठी पाच लाखांपर्यंत अर्ज आले होते. आता आठ हजार जागांसाठी ४० हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. बेरोजगारी वाढल्याने लाखो अर्ज दाखल होतात परंतु, आवश्‍यक तेवढ्याचा जागा भरल्या जातील.  - दिवाकर रावते, परिवहनमंत्री  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com