कृषिपंपाच्या बिल दुरुस्तीसाठी राज्यव्यापी अभियान : प्रताप होगाडे 

शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने बोगस वीजबिले पाठविण्यात आली आहेत. बिल दुरुस्तीसंदर्भात शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी जिल्हानिहाय अभियान राबविण्यात येत असल्याची माहितीप्रताप होगाडे यांनी दिली.
कृषिपंपाच्या बिल दुरुस्तीसाठी राज्यव्यापी अभियान : प्रताप होगाडे 
कृषिपंपाच्या बिल दुरुस्तीसाठी राज्यव्यापी अभियान : प्रताप होगाडे 

नागपूर ः शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने बोगस वीजबिले पाठविण्यात आली आहेत. बिल दुरुस्तीसंदर्भात शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी राज्यभरात जिल्हानिहाय अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती जनता दल (से)चे प्रदेश प्रधान महासचिव प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मीटर नसलेल्या शेतकऱ्यांना पंपाच्या वास्तविक क्षमतेपेक्षा अधिक अश्‍वशक्तीचे सरासरी बिल पाठविले जाते. तर मीटर असणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट बिल पाठविण्यात येत आहे. २०११-१२ पासून हीच पद्धती सुरू आहे. यामुळे वीजबिलांची दुरुस्ती करून घेण्यासंदर्भात व्यापक अभियान राबविले जात आहे.

राज्य सरकारने कृषिपंप वीजबिल सवलत योजना जाहीर केली आहे. योजना राबवीत असतानाच चुकीच्या सर्व बिलांची दुरुस्ती करून द्यावी यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी महावितरणकडे ऑनलाइन तक्रार करण्याचा शेतकऱ्यांकडे आग्रह धरला जात आहे. 

सरकारने सप्टेंबर २०२० पर्यंतचे थकीत बिल फ्रिज केले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बिल भरले नाही तरी वीज कनेक्शन महावितरणला कापता येऊ शकत नाही. यामुळे कृषी ग्राहकांनी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जनता दल (से)तर्फे आज आमदार निवास येथील कार्यकर्ता संमेलन करण्यात आले.

त्यात शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे तत्काळ मिळावे, कोरोना काळातील वीजबिल माफ करावे, वाढत्या महागाईला आवर घालण्यात यावा, नागपूर मनपातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, ६० वर्षांवरील शेतकरी व असंघटित क्षेत्रातील मजुरांना दरमहा ५ हजार रुपये पेंशन द्यावे आदी विषयांवर लवकरच आंदोलन उभारण्याचा निर्णय या संमेलनात घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष रमेश शर्मा, प्रदेश महासचिव डॉ. विलास सुरकर, अविनाश निमकर, महिला आघाडी अध्यक्ष सिरता मानकर, मुन्ना शेख उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com