agriculture news in marathi state wide control room for vegetable and fruit supply | Agrowon

फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर नियंत्रण कक्ष

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व भाजीपाला उपलब्ध करण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गटांकडून फळे आणि भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी कृषी आयुक्तालयाने प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष तयार केले आहेत. 

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व भाजीपाला उपलब्ध करण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गटांकडून फळे आणि भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी कृषी आयुक्तालयाने प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष तयार केले आहेत. 

कोरोना विषाणू साथीमुळे राज्यभर सुरू असलेल्या संचारबंदीमुळे फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीसाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी सर्व जिल्ह्यातील एसएओंना कक्ष उभारण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर २४ तासात ३५ नियंत्रण कक्ष उभे राहिले आहेत. 

शासनाने फळे व भाजीपाला या जीवनाश्यक वस्तूचा पुरवठा राहण्याकरिता निर्देश दिलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला व फळे पुरविण्याची जबाबदारी कृषी विभागाकडे देण्यात आली आहे. फळे व भाजीपाला उपलब्ध करणाऱ्या शेतकरी संस्था, गट आणि उत्पादक संघटनांसाठी नियंत्रण कक्ष काम करतील. शहरी व निमशहरी भागात फळे व भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी कक्षाचे अधिकारी काम करणार आहेत. 

नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील भाजीपाला व फळे उत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक गट, संघ, कंपन्या यांची माहिती संकलित करावी. तसेच बाजाराची ठिकाणी निश्चित करण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे, माल वाहतूक परवान्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, पोलिस यंत्रणा अधिनस्त उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी समन्वय ठेवावा.

यासोबत कोणत्याही परिस्थितीत भाजीपाला व फळे यांचा पुरवठा खंडीत होणार नाही, याची दक्षता घेऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल रोजच्या रोज सादर करावा. शेतकरी उत्पादक कंपन्या, संघ, शेतकरी गटाची माहिती संकलित करून जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याची जबाबदारी एसएओंकडे देण्यात आली आहे.  

राज्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या वाशी मार्केटसाठी ९४२११९४२१२ व ९४२२४३०२७८ असे दोन क्रमांक नियंत्रण कक्षाचे आहेत. राज्यातील फळे व भाजीपाला पुरवठयाबाबत कृषी आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२०-२५५१०६८४ असा आहे. 

जिल्हानिहाय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक

जिल्हा संपर्क अधिकारी संपर्क
ठाणे रावसाहेब जाधव ९४०३७७८१५२
किसन शिगवण ८८८८८६६८६०
प्रदीप निकम ९९६७०००१८४
दीपक वाघ ९६१९५६९६५६
पालघर मनोज वाकळे ७८७५४९७००८
रायगड पांडुरंग शेळके ९४२३७८८३९९
तेजस महाले ९५६१८१८१५४
प्रल्हाद बनवरे ९६७३६१५४७४
सिंधुदूर्ग एस.एन. म्हेत्रे ९४२२४१०६५३
आर.बी. चौगुले ९४२१२६२०७६
एस.के. घाडी ९४२३०५२९३६
आर.टी.कदम ९४२१२६२०७५
रत्नागिरी विद्याधर वैद्य ९४२३८७५०१०
वसीम मुकादम ८०८७३४६७१८
ठाणे विभाग स्तर प्रमोद लहाळे ९४२११९४२१२
विकास पाटील ९४२२४३०२७८
कोल्हापूर जालिंदर पांगरे ८२०८२५९२९९
सातारा महेश झेंडे ७७७४०७५५८९
व्ही. राऊत ९४२०६८५८९५
ए. महामूलकर ९८५०५५०८८५
सांगली सुरेश मगदूम ९४०४९५४४०२
नाशिक संजय सुर्यवंशी ९२२२२७७४२१
कैलास शिरसाठ ७०२०८५४१०७
विजय निर्भावने ९४२३१८३१५२
नंदुरबार निलेश भागेश्वर ९४०५६६०९८१
एस. ए. शेळके ९४०४११०८७८
के. ई. हाडपे ८०५५८२४८६४
धुळे व्ही.एस. सोनवणे ९४०३३२६२००
एस.डी. मालपुरे ७०२०३९९०८६
जी.के. चौधरी ९४२३५१७९७४
जळगाव संजय पवार ९५११७६५५६४
चेतना मिश्री ९४२४९५३७९५
नाशिक विभागस्तर अभय फलके ९४२३५७५३२५
सुरेश खैरनार ९४२३०५९३६६
पुणे विजय कानडे ९४२२०६६९८७
नगर ए. पी. गवळी ९१७२५२०८८७
पी. सी. गोरे ९४२१५५८८३४
एस.पी. जावळे ७०२०८७६५१९
सोलापूर यू बी. बिराजदार ९४२३५०७०४१
आर.एन. कांबळे ९४०३९६४४४५
एस. तळेकर ९४२३०६६४७९
पुणे विभागस्तर रफिक नाईकवडी ९५२७१०७८१८
औरंगाबाद अनिलकुमार हदगावकर ९४२१३१६०९३
श्री. घायल ९४२०४८६५८०
विश्वास जाधव ९४२२९०५१९२
बीड व्ही. एम. मिसाळ ९४०३८०९६३९
जालना व्ही. सी. माईनकर ९४२३६९०१०१
सुमित येलमार ९०२२३९७६८१
लातूर आर. टी. मोरे ९४०३१०१७७७
नितीन कांबळे ९८३४०२०३९३
डी. बी. शिंदे ९४२३३४६१८६
उस्मानाबाद ए.ए. काशीद ८६००३०१५००
सी.बी. मंगरूळे ९८६०४२२२२१
एस.डी. सोनटक्के ८१७७८५३८९३
डी.एस. शिंदे ८३२९६७१६७४
डी. जी. विधाटे ९४०३२९१२२८
नांदेड एस. के. सोनटक्के ७५८८६३२१६१
एस.एस.स्वामी ८४८९१६८३७०
एन. फारूक ९५९५७१७१३१
एच आर. चव्हाण ९४२३१३८२०५
श्रीहरी बिराजदार ८२७५५५६३१६
ए.एस. तापसे ७०५७५५६२६९
परभणी एस. के. चव्हाण ९४२२७५०००४
एस.जे. जगताप ८६०५८६८६७९
एम.बी. लोंढे ९६०४६०७८७२
नंदकिशोर थोरे ७९७२०७११५५
बी.एस. रूपनवर ९५११२४२०२३
हिंगोली वाय. पी. शहारे ७३९७९९३४१३
रोहित क्षिरसागर ८०३०७२९५१३
बी.एस. जेवे ८३८०८३२२७८
सी.डी. कोटकर ९४२३७८९९९१
शेख राजस ९१३०६२५२३३
आर.बी. सरनाईक ९७३०४४०२३८
लातूर विभाग बी. व्ही. वीर ९४२२७७२९५२
आर.टी. मोरे ९४०३१०१७७७
श्री. राक्षे ९८३४१९८०५१
श्री. भुजबळ ७५८८३९००४७
महादेव असालकर ७०२०२३३३६१
एन.ए. काझी ८८३०१९५९७८
अमरावती अनिल खर्चन ७५८८७३७०३०
दीपक चौधरी ९४०४६८९०८५
अकोला मोहन वाघ ९४२३१७६०९५
ए. पी. शास्त्रकर ९५७९९९०६१०
एम. शेगावकर ७५८८७६२७६२
बुलढाणा बीपीनकुमार राठोड ९४२२९४१३६५
सी.एन पाटील ८४०८०६६३४७
एन. डी. पदमाने ९९६००७२६५५
वाशिम निलेश ठोंबरे ९४२१३९६६९१
एस.के.पडघन ९४२३१६१६५९
कु. मनिषा लांगोटे ८४५९५७५९२०
यवतमाळ श्री. पिंपरखेडे ९४०४०८५६५६
श्री. एम्बडवार ९२८४४९६१११
श्री. आवारे ९७६७०७१९०६
श्री. राठी ९४२३१३२९०५
श्री. चव्हाण ९२८४२२२१२५
नागपूर श्री. उपारीकर ८८०६०२१७००
भंडारा सी. एन. कापगटे ९४०५७२९८८६
गोंदिया भिमाशंकर पाटील ९४०४३१५२२७
चंद्रपूर गणेश मदेवार ९९२१९९४३१७
गडचिरोली श्रीमती. जाधव ८४२२९११७४०
वर्धा श्री. अमृतसागर ९४०३९६३५३५ 

 


इतर अॅग्रो विशेष
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
रेशीम शेतीतून टाकळीने बांधले प्रगतीचे...यवतमाळ जिल्हयात रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिक...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....