agriculture news in marathi, statelevel seminar on sugar technology, pune, maharashtra | Agrowon

आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी प्रयोगशील व्हावे ः साखर आयुक्त
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग पॉइंट ठरणार आहे. त्यामुळे विविध आव्हानांवर मात करण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यांना अतिशय प्रयोगशील व्हावे लागेल, असा सल्ला साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला.  

पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग पॉइंट ठरणार आहे. त्यामुळे विविध आव्हानांवर मात करण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यांना अतिशय प्रयोगशील व्हावे लागेल, असा सल्ला साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला.  

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) व  डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट (डीएसटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता.१७) आयोजित केलेल्या साखर उद्योगातील प्रक्रिया अभियांत्रिकी आणि उत्पादन तंत्र याविषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. गायकवाड बोलत होते. विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, सरचिटणीस पांडुरंग राऊत, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, डीएसटीएचे उपाध्यक्ष एस. एस. गंगावती, बाबासाहेब पवार या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी श्री. गायकवाड म्हणाले, की साखर कारखान्यांसाठी यंदाचे वर्ष महत्त्वाचे असल्याने अतिशय नियोजनपूर्वक वाटचाल करावी लागेल. दुष्काळामुळे ऊस उत्पादन घटेल पण साखरेचा साठा चांगला राहील. एकीकडे आफ्रिकन देशात कारखानदारी वाढत राहील. दुसरीकडे आरोग्यासाठी साखर अपायकारक असल्याचा प्रचार वाढत असल्याने खप कमी होत जाण्याची देखील शक्यता आहे. अशा स्थितीत कारखान्यांना प्रयोगशील व्हावे लागेल.

कारखान्यांनी बांधावरच ऊसतोड करून थेट ज्यूस तयार करून नंतर कारखान्यात नेता येतो का ते पाहावे, मध्यस्थांना हटवून साखर विक्रीसाठी प्रयत्न करावा तसेच इथेनॉल मिश्रणातदेखील स्वतः पुढाकार घ्यावा, अशा सूचना देखील श्री. गायकवाड यांनी  केल्या. 

खासगी आणि सहकारी कारखाना असा भेद केंद्र शासन करीत असल्याबद्दल श्री. ठोंबरे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘खासगी कारखान्यांना २०१५ मधील सॉफ्टलोन व्याज सवलत, २००९ मधील घट उतारा अनुदान दिले गेले नाही. नव्या इथेनॉल धोरणातही भेदभाव करण्याचा प्रयत्न होत आहे,’’ असे श्री. ठोंबरे यांनी नमूद केले. 

श्री. दांडेगावकर म्हणाले, की ऊस आणि कापूस या दोन्ही पिकांमुळे राज्यात साखर व वस्त्रोद्योग तयार झाला. मात्र, नियोजनपूर्वक प्रोत्साहन न मिळाल्याने दोन्ही उद्योग भरभराटीला आले नाहीत आणि लयालाही गेले नाहीत. या उद्योगांना कुंठितावस्थेतून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. साखर उद्योगाला मात्र कमी पाण्यात, कमी वेळेत मिळणाऱ्या आणि जादा उतारा असलेल्या ऊस वाणाशिवाय पर्याय नाही,” 

या वेळी विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ तसेच राज्यातील १२५ कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. साखर उद्योगातील प्रक्रिया अभियांत्रिकी आणि उत्पादन तंत्रावर या वेळी विविध तज्ज्ञांकडून सादरीकरण करण्यात आले. 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...
शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटीपरभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे...
पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊसजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या...
‘टेंभू‘चे पाणी आटपाडीत, शेतकऱ्यांना...आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात...
‘शेतकरी सन्मान योजने‘च्या अनुदानासाठी...कळमनुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत...
तीन कारखान्यावरील कारवाई अंतिम टप्प्यातसोलापूर : ‘‘सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...