Agriculture news in marathi; Statement of Onion Rate Farmers' Association | Agrowon

धुळे : कांदा दरप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे निवेदन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

धुळे  ः कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याने मध्यंतरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू लागला होता. नव्या हंगामातही दर स्थिर राहतील, असे वाटत होते. परंतु, केंद्र सरकारने कांद्याची निर्यात व निर्यातमूल्य यासंबंधी शेतकरीविरोधी निर्णय, अटी लागू केल्याने दर पुन्हा खाली आले आहेत. या अटी मागे घेतल्या जात नाहीत तोपर्यंत कांद्याचे लिलाव, खरेदी बंद करावी, अशी मागणी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेतर्फे साक्री (जि. धुळे) येथील बाजार समितीकडे करण्यात आली आहे. 

धुळे  ः कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याने मध्यंतरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू लागला होता. नव्या हंगामातही दर स्थिर राहतील, असे वाटत होते. परंतु, केंद्र सरकारने कांद्याची निर्यात व निर्यातमूल्य यासंबंधी शेतकरीविरोधी निर्णय, अटी लागू केल्याने दर पुन्हा खाली आले आहेत. या अटी मागे घेतल्या जात नाहीत तोपर्यंत कांद्याचे लिलाव, खरेदी बंद करावी, अशी मागणी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेतर्फे साक्री (जि. धुळे) येथील बाजार समितीकडे करण्यात आली आहे. 

संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष शशिकांत भदाणे यांनी याबाबत निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की कांद्याचे दर मागील वर्षात नोव्हेंबरपासून ते यंदाच्या जुलैपर्यंत दबावात होते. जुलैच्या अखेरीस दरात सुधारणा होत गेली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये दर ४००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. 

यामुळे शेतकऱ्यांना मध्यंतरी आलेले नुकसान भरून निघेल व दिवाळीनंतर बाजारात जो कांदा येईल, त्यासही चांगले दर मिळतील, दर स्थिर राहतील, अशी अपेक्षा वाढली. परंतु सरकारने कांद्याचे दर कमी व्हावेत यासाठी निर्यातमूल्य, निर्यातबंदी अशा अटी, नियम लागू केले. यामुळे कांद्याचे दर आठवडाभरात कमी झाले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान भरून निघणार नाही. कारण पुढेही दर वाढतील, अशी स्थिती नाही. सरकारने हा निर्णय लागू करून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. हा निर्णय जोपर्यंत सरकार मागे घेत नाही, निर्यातीला प्रोत्साहन मिळून दर जोपर्यंत सुधारत नाहीत तोपर्यंत साक्री बाजारात कांद्याची खरेदी बंद करावी, कांदा लिलाव बंद करावेत, अशी मागणी भदाणे यांनी केली. निवेदन देताना शांताराम गांगुर्डे, जगन्नाथ राजपूत, पोपट कुवर, दीपक सोनवणे, एन. झेड. देवरे, देवीदास भदाणे आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...
महाशिवआघाडीत सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी...मुंबई ः राज्यात भाजपला वगळून शिवसेना, राष्ट्रवादी...
शेतकऱ्यांवर रब्बी ज्वारीचे पीक...औरंगाबाद : मकानंतर आता रब्बी ज्वारीवर लष्करी...
दौंड बाजार समितीत ज्वारीला ४३०० रुपये दरदौंड, जि. पुणे : दौंड बाजार समितीमध्ये ज्वारीची...
खानदेशात रब्बीसाठी प्रकल्पांमध्ये...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामाची शेतकरी...
पुणे : हरभरा उत्पादनवाढीसाठी ४००...पुणे ः हरभरा उत्पादनवाढीसाठी रब्बी हंगामात अकरा...
मांजरपाडा प्रकल्पग्रस्तांची पूल...नाशिक  : दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा वळण...
खारपाण पट्ट्यातील कापूस हंगामही अडचणीतअकोला ः सततच्या पावसाने खरिपातील सर्वच...
पुणे : पंचनाम्यापासून अद्यापही १५ हजार...पुणे ः पुणे जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांचे...
कोल्हापूर जिल्ह्यात केवळ पाच टक्के...कोल्हापूर : पावसाचा फटका खरीप हंगामात बसल्याने...
जालना जिल्ह्यात खरेदी केंद्रांना मिळेना...जालना : जिल्ह्यातील सोयाबीन, मूग, उडीद, मक्याची...
हिंगोली : पावणेदोन कोटीचे कृषी...हिंगोली : जिल्ह्याचा २०२०-२१ या वर्षीचा संभाव्य...
सांगलीत ९९ हजार हेक्टरवर पिकांचे पंचनामेसांगली : ऑक्टोबरमधील पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे...सोलापूर : ऑक्‍टोबर महिन्यात मॉन्सुनोत्तर पावसाने...
गहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रणगहू पिकांच्या उत्पादनात घट येण्यामध्ये किडींचा...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३२५० ते ६२५०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...