Agriculture news in Marathi Statement to Sub-Divisional Officers of Rayat Kranti Sanghatana | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती संघटनेचे निवेदन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

नाशिक :  शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी नाशिक जिल्हा रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. ७) या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांना देण्यात आले.

नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग आला आहे. मात्र, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. अनेक प्रश्न असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. असे असूनही सरकार व प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी नाशिक जिल्हा रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. ७) या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांना देण्यात आले.

सोयाबीन बियाणे उगवण अडचणी, मका व कापूस खरेदी, कांद्याचे पडलेले दर व सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळत नसलेला पीक कर्ज असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्या अनुषंगाने रयत क्रांती संघटनेने सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. शासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाध्यक्ष वाल्मिक सांगळे, येवला तालुकाध्यक्ष शंकरराव गोरे, प्रशांत सानप, नवनाथ उगले, सुभाष सांगळे आदींनी प्रातिनिधिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवेदन सादर केले.

प्रमुख मागण्या

  • संपूर्ण कर्जमाफी मिळावी.  
  • वीज पंपाची बिले माफ करण्यात यावी.
  • दुधाला प्रति लिटर ३० रुपये दर द्यावा.
  • नित्कृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी  
  • कापूस शेवटपर्यंत खरेदी करावा.
  • कांद्याला अपेक्षित दर नसल्याने प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान देण्यात यावे.
  • खासगी सावकार फायनान्स कंपन्या बँक यांच्याकडून सुरू असलेल्या सक्त वसुलीवरती बंदी घालावी.
  • बँक अधिकाऱ्यांचे आडमुठे धोरण थांबवून शेतकऱ्याला पीककर्ज द्या.

इतर ताज्या घडामोडी
अधिक आर्द्रतायुक्त वातावरणात द्राक्ष...सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत पाऊस व पावसाळी...
जमीन सुपिकतेसाठी कंपोस्ट खत निर्मितीकंपोस्ट खताचा उपयोग जमिनीत केल्यास जमिनीत पूर्वी...
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...