Agriculture news in Marathi State's energy department demands Rs 10,000 crore: Dr. Raut | Agrowon

राज्याच्या ऊर्जा विभागाची १० हजार कोटींची मागणी ः डॉ. राऊत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 जुलै 2020

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महावितरण आर्थिक संकटात सापडले आहे. याही परिस्थितीत वीजग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे आवश्यक असून, त्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे १० हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात महावितरणने ग्राहकांना सेवा दिली. मात्र, या काळात वीजबिल भरणा प्रमाण अत्यंत कमी झाल्याने महावितरण आर्थिक संकटात सापडले आहे. याही परिस्थितीत वीजग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे आवश्यक असून, त्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे १० हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे.

याबाबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी (ता. २) केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांना पत्र दिले आहे. लॉकडाउनच्या काळातील वीजबिलांमध्ये सवलत देण्यात यावी, अशी मागणी विविध संघटना व वीजग्राहकांकडून करण्यात येत आहे. या काळात सर्वच उद्योग व व्यावसायिक आस्थापने बंद होती. वीजग्राहकही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. अशाही परिस्थितीत महावितरण ग्राहकांना चांगली सेवा पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे.

महावितरणच्या एकूण महसुलापैकी सुमारे ६० टक्के महसूल औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांकडून प्राप्त होतो. त्यामुळेच घरगुती आणि कृषी ग्राहकांना क्रॉस अनुदानाच्या माध्यमातून वाजवी दराने वीजपुरवठा करण्यात येतो. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर एप्रिल, मे व जून या कालावधीमध्ये महावितरणच्या महसुलावर मोठा परिणाम झाल्याचे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. वीज खरेदी, कर्मचाऱ्यांचे पगार, विविध कर, कर्जाचे हप्ते इत्यादींसाठी खर्च करणे महावितरणला क्रममप्राप्त आहे. महावितरण आर्थिक संकटात सापडले असून, दैनंदिन कामांकरिता निधीची उणीव निर्माण झाली आहे.

‘महावितरण’वर संकट
एप्रिल २०२० पासून वीजनिर्मिती कंपन्यांचे देणे प्रलंबित आहे.''महावितरण''वर या अभूतपूर्व संकटाचे दूरगामी आर्थिक परिणाम झाले आहेत. तसेच, निधी उपलब्धतेबाबत बँक तसेच वित्तीय संस्थांकडून महावितरणला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. केंद्र सरकारने दिलेल्या ९० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचा लाभदेखील महावितरणला मिळाला नाही. या सर्व बाबींचा परिणाम महावितरणच्या ग्राहकांवर होत आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...