Agriculture news in Marathi States should take initiative for deprived farmers: Tomar | Agrowon

वंचित शेतकऱ्यांसाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा ः ः तोमर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले.  

पुणे : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील १० कोटी ७५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ‘पीएम-किसान’ योजनेचा निधी जमा करण्यात आला आहे. शासनाची पारदर्शकता व जलद सेवा यातून सिद्ध होते. मात्र अद्यापही या योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले.  

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेला दोन वर्षे झाल्याबद्दल उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांचा गौरव करण्यासाठी दिल्लीत आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्राच्या वतीने कृषिमंत्री दादा भुसे, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी राज्य पातळीवरील पारितोषिक स्वीकारले.

योजनेतील लाभार्थ्यांची भौतिक तपासणी व तक्रार निवारण अशा दोन्ही मुद्द्यांवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दोन जिल्ह्यांना पारितोषिक देण्यात आले. पुण्याच्या वतीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख, एसएओ ज्ञानेश्वर बोटे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी, तर नगरच्या वतीने जिल्हाधिकारी आर. बी. भोसले, एसएओ शिवाजी जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचिट यांनी पारितोषिक स्वीकारले.

शेतकऱ्यांसोबत चर्चेस तयार ः तोमर
पीएम-किसान योजनेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यानंतर पत्रकारांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना आंदोलनबाबत छेडले. ‘‘शेतकऱ्यांच्या मुद्द्यांबाबत केंद्र सरकार संवेदनशील आहे. काही मुद्दे आल्यास शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे,’’ असे उत्तर नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले.


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
कांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर...नाशिक : चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील...
उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय...! रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर : कोरोनाच लय भ्या...
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या...
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
लासलगावला कांदा लिलावात सहभागी होण्यास...नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या...
विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची...पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि...
हापूसचा दराचा गोडवा टिकून रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा...
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...