Agriculture news in Marathi Statewide agitation of Congress on fuel price hike | Page 3 ||| Agrowon

इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 जून 2021

पाच राज्यांमधील निवडणुका होईपर्यंतच इंधनाचे दर स्थिर होते. त्यानंतर दर झपाट्याने वाढतील, असा अंदाज लावला जात होता आणि तो तंतोतंत खरा ठरला. या दरवाढीच्या विरोधात सोमवारी (ता. ७) कॉंग्रेस रस्त्यावर उतरली.

नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे प्रत्येक जण वैतागला आहे. पाच राज्यांमधील निवडणुका होईपर्यंतच इंधनाचे दर स्थिर होते. त्यानंतर दर झपाट्याने वाढतील, असा अंदाज लावला जात होता आणि तो तंतोतंत खरा ठरला. या दरवाढीच्या विरोधात सोमवारी (ता. ७) कॉंग्रेस रस्त्यावर उतरली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार अभिजित वंजारी, प्रदेश कॉंग्रेस सचिव गिरीश पांडव, गडचिरोली कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार नामदेवराव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, परसराम टिकले, महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी नगराध्यक्ष हिरा मोटवानी, जेसा मोटवानी यांच्यासह शेकडो कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. इंधन दरवाढीविरोधात यावेळी केंद्र सरकारचा निषेध करून मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

पुणे, नगर, नागपूरसह राज्यभरात आंदोलन करण्यात आले. आज पेट्रोलचे दर हे २७ पैशांनी तर डिझेलचे दर हे २८ पैशांनी वाढले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात रोज सकाळी ६ वाजता बदल होत असतो. सकाळी ६ वाजताच नवे दर लागू होत असतात. परकीय चलन दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती काय आहेत, त्यानुसार रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होतो. रोज वाढणाऱ्या इंधन दरामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....
नांदेडमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याचे...नांदेड : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या...
खानदेशात सोयाबीन पेरणीत घटजळगाव : खानदेशात यंदा नापेर क्षेत्र यंदा वाढणार...
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ...सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तर...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...