नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण दे
ताज्या घडामोडी
वीज जोडणी तोडल्यास राज्यभर आंदोलन : भाजप
महावितरणने वीज जोडणी तोडल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ यांनी दिला आहे.
अकोला : आधीच कोरोनामुळे गेले वर्षभर शेतकरी व सर्वसामान्य माणूस आर्थिक संकटात सापडला आहे, अशा परिस्थितीत महावितरण कंपनी सर्वसामान्य ग्राहकांना जास्तीचे वाढीव वीजबिल देऊन त्यांना आर्थिक व मानसिक त्रास देत आहे. त्यामुळे महावितरणने वीज जोडणी तोडल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ यांनी दिला आहे.
या बाबत वाघ यांनी म्हटले आहे, ‘‘घरगुती वापराचे व कृषिपंपाचे विद्युत बिल रीडिंग न घेता अव्वाच्या सव्वा पद्धतीने वीज बिल दिले जात आहे. चुकीच्या पद्धतीने दिलेली जास्तीची बिले न भरल्यास वीज जोडणी तोडण्याची धमकी महावितरणाचे कर्मचारी देत आहे. तसेच वाढीव बिल कमी करून देण्याच्या नावाखाली ग्राहकांकडून पैशांची मागणी केली जात आहे. त्यामुळे शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन जनतेची होणारी फसवणूक थांबवावी.
ग्राहकांनी वापरले तितकेच बिल त्यांना द्यावे. सर्वसामान्य जनतेची होणारी लूट थांबवावी. चुकीच्या पद्धतीने वीज जोडणी कापू नये, अन्यथा राज्य शासन व महावितरण कंपनीच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी राज्यभर रस्त्यावर उतरून त्यांना धडा शिकवतील.’’