Agriculture news in Marathi Statewide agitation of Kisan Sabha on milk issue today | Agrowon

दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे आंदोलन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 जून 2021

दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७) किसान सभेतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. किसान सभेचे पदाधिकारी आपापल्या भागात या आंदोलनात सहभागी होतील.

नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७) किसान सभेतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. किसान सभेचे पदाधिकारी आपापल्या भागात या आंदोलनात सहभागी होतील. सकाळी दूध संकलन केंद्रावर शेतकरी व आंदोलक सरकाररूपी दगडाला दुग्धाभिषेक घालतील व त्यानंतर तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन मागण्याचे निवेदन देतील, अशी आंदोलनाची रूपरेषा ठरली आहे. दूध उत्पादक संघर्ष समितीचे पदाधिकारीही आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

कोरोनामुळे दुधाला मागणी नसल्याचे सांगून खासगी दूध संघचालकांनी दुधाचे दर कमी केले आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका दूध उत्पादकांना बसत असताना सरकारने मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने दूध उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. दूध व्यवसायाची अवस्था गंभीर झाली असताना सरकार दुधाच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत असल्याने किसान सभेने गुरुवारी राज्यभर दूध व इतर शेतकरी प्रश्‍नावर आंदोलन पुकारले आहे. 

त्यानुसार किसान सभेचे व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी आपापल्या भागात या आंदोलनात सहभागी होतील. सकाळी दूध संकलन केंद्रावर शेतकरी व आंदोलक सरकार रुपी दगडाला दुग्धाभिषेक घालतील व त्यानंतर तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन मागण्याचे निवेदन देतील. 

आंदोलनात अजित नवले अकोल्यात, उमेश देशमुख सांगलीत, उदय नारकर कोल्हापुरात, सिद्धपा कलशेट्टी सोलापुरात, दादा रायपुरे बुलडाण्यात, अर्जुन आडे नांदेड, किसन गुजर व सुनील मालुसरे नाशिकमध्ये व इतर पदाधिकारी त्या त्या भागात सहभागी होणार आहेत. सर्व ठिकाणी आंदोलक कोरोनाचे नियम पाळतील, असे सांगण्यात आले.


इतर अॅग्रो विशेष
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...