वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणे

दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज देयके माफ करण्यात यावीत आणि या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी, या मागणीसाठी सोमवारी (ता. १०) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
Statewide hold on Monday for electricity bill waiver
Statewide hold on Monday for electricity bill waiver

कोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज देयके माफ करण्यात यावीत आणि या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना,  महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समिती यांच्या वतीने सोमवारी (ता. १०) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याचवेळी धरणे आंदोलन करावे, असे आवाहन प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, प्रताप होगाडे, आर. के. पवार आदींनी केले आहे.

 या मागणीसाठी प्रथम १३ जुलैला राज्यस्तरीय वीज बील होळी आंदोलन जाहीर करण्यात आले होते. हे आंदोलन २२ जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये, गावांमध्ये व मुंबईसह अन्य शहरांमध्येही झाले. या आंदोलनानंतर राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलांमध्ये २० टक्के ते ३० टक्के सवलत देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. तथापि, ही तोकडी सवलत वीज ग्राहकांना मान्य नाही, तर उलट आजच्या  स्थितीत अडचणींवर मीठ चोळणारी आहे. अशा परिस्थितीत सरकारने संपूर्ण वीज बिल माफी करावी, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे. त्यामुळे हे ३ महिन्यांचे वीज बिल ग्राहक भरणार नाहीत असा निर्धार व जाहीर आवाहन या बैठकीद्वारे एकमताने करण्यात आलेला आहे. तसेच उर्जामंत्र्यांनी जाहीर केलेल्या दरमहा १०० युनिटसच्या आतील ग्राहकांना मोफत वीज या घोषणेची त्वरित अंमलबजावणी करावी, अशीही या संघटनांची मागणी आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com