Agriculture News in Marathi Statewide for voter registration Special camps in Gram Panchayats | Page 2 ||| Agrowon

मतदार नोंदणीसाठी राज्यभरात ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिबिर

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 ऑक्टोबर 2021

राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे.

नागपूर : राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. नवीन मतदारांची नोंदणी, गावातील लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या महिलांना यादीतून वगळणे तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांची नोंदणी करणे, त्यासोबतच दिव्यांगाची नोंदणी करणे व त्यांना चिन्हांकित करण्याचे काम या शिबिरात करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विमला आर., उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार राहुल सारंग उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगातर्फे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा यांच्या मतदार यादीचे विश्‍लेषण करण्यात येते. सर्वसामान्यपणे, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी ६० ते ७० टक्के असते. त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उद्योग क्षेत्रात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे मतदानाविषयी जनजागृती करण्यात येऊन नवमतदारांना मतदान नोंदणी प्रक्रियेची माहिती जसे छायाचित्र, नाव, आवश्यक कागदपत्रे आदींची माहिती देऊन जनजागृती करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. 

एक नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत उद्योग क्षेत्रात शिबिराचे आयोजन करून नमुना ६, ८ व १४ भरून घ्यावे. या कामात जिल्हा उद्योग विभागाचे महाव्यवस्थापक व महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे ते म्हणाले. 

औद्योगिक क्षेत्रात मतदार जागृतीसाठी पोस्टर, होर्डिंगद्वारे विस्तृत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासोबतच अधिकार आहे, या बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नागपूर विभागात मतदार जागृती करून मतदारांची टक्केवारी वाढविण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.


इतर अॅग्रो विशेष
ऊस पाचट वजावटीपोटी  २२५ कोटींवर डल्ला पुणे ः यंत्राने होणाऱ्या ऊसतोडीत पाचटाच्या...
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार...पुणे : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब...
देशातील ७२ गावे होणार ‘व्हिलेज ऑफ एक्‍...नागपूर ः केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इस्राईल...
राज्य, परराज्यातील मजुरांचा  कडवंची...जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून...
निसर्गाच्या साक्षीने रंगली गोष्ट एका...अकोला ः सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या...
शिरूरमध्ये दोन हजार रोहित्रे बंद पुणे : वीजबिल थकल्याने महावितरण शिरूर उपविभागातील...
जालन्यात विम्यासाठी ‘स्वाभिमानी’चे...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...
सरकारी अनुदान नसतानाही  यंदा साखर...पुणे ः भारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता...
कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडू नये, अन्यथा...कोल्हापूर : कृषिपंपाचे रात्रीचे १० तास...
कृषिपंपाचे तोडलेले वीजकनेक्शन पूर्ववतबुलडाणा ः शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे तोडलेले...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...