सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे तीन जानेवारीला पुणे विद्यापीठात अनावरण

पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाला आणि इमारतीला साजेसा असा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा. सावित्रीबाईंच्या येणाऱ्या जयंतीदिनी (३ जानेवारी) या पुतळ्याचे अनावरण होईल, अशा पद्धतीने सर्व काम पूर्ण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
Statue of Savitribai Phule unveiled at the university on January 3
Statue of Savitribai Phule unveiled at the university on January 3

पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाला आणि इमारतीला साजेसा असा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा. सावित्रीबाईंच्या येणाऱ्या जयंतीदिनी (३ जानेवारी) या पुतळ्याचे अनावरण होईल, अशा पद्धतीने सर्व काम पूर्ण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. या वेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. 

विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्याबाबत नवीन विश्रामगृहातील सभागृहात शनिवारी (ता.२७) बैठक झाली.  बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी उपस्थित होते. तर बैठकस्थळी पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पुरातत्त्व संचालक डॉ. तेजस गर्ग, प्रा. हरी नरके, विद्यापीठाचे प्रबंधक डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते. 

भुजबळ म्हणाले, ‘‘कात्रज येथील परदेशी स्टुडिओमध्ये पुतळा बनवण्याचे काम सुरू आहे. शनिवारी (ता.२७) त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे.’’ 

पवार म्हणाले, ‘‘या स्मारकास जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील स्मारके समितीची आणि महानगरपालिकेच्या वारसा स्थळ (हेरिटेज) समितीची ना-हरकत देऊन तत्काळ या कामास सुरवात करावी.’’ 

‘‘येत्या ८ डिसेंबर रोजी समितीची बैठक आहे. यामध्ये या स्मारकाबाबत प्रस्ताव आल्यानंतर तत्काळ ना-हरकत दिली जाईल,’’ असे हेरिटेज समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com