राज्यात ३७ हजार सिंचन विहिरींची कामे पूर्ण, ५६४ कोटी रुपये खर्च !

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राज्यातील ३४ जिल्‍ह्यांमध्ये वर्षभरात ३७ हजार ६५७ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर ५६४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. वर्षभरात सर्वाधिक ३६३५ विहिरींची कामे बीड जिल्ह्यात पूर्ण झाली आहेत, अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली. 

ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळण्यासह सिंचनाची सुविधा व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरींची कामे केली जातात. २०११ पासून ही योजना सुरू झालेली असून ४० टक्के कुशल व ६० टक्के अकुशल कामे केली जातात. सुरवातीला विहिरींसाठी १ लाख ९० हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते. २०१२ पासून त्यात वाढ करून ही रक्कम तीन लाख करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने असलेल्या दुष्काळी परिस्थितीत मजुरांना रोजगार मिळण्यासाठी नरेगातून सिंचन विहिरींची कामे केली जात आहेत.

यंदाच्या वर्षात (२०१८-१९) ३४ जिल्ह्यांमध्ये ३७ हजार ६५७ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. या पूर्ण झालेल्या कामांवर ५६४ कोटी ४४ लाख रुपये खर्च झाले आहेत. याशिवाय ५० हजार ७१३ कामे सुरू असून, ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  अनुदानावर सिंचन विहीर करण्याची योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे १ लाख ८४ हजार विहिरींची कामे पूर्ण झाली असून, ३ हजार ६५५ कोटी १४ लाख रुपयांचा खर्च झाला असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागातून देण्यात आली. आतापर्यंत १४ हजार ९४४ व यंदाच्या वर्षातही सर्वाधिक कामे बीड जिल्ह्यामध्ये झाली आहेत. सध्याही बीडमध्ये सर्वाधिक ४०२० कामे सुरू आहेत. आतापर्यंत तब्बल २७४ कोटी रुपये बीडमध्ये विहिरींच्या कामांवर खर्च झाले आहेत.    वर्षभरात पूर्ण झालेली विहिरींची कामे  नगर ः ७२९, अकोला ः ५७७, अमरावती ः २९५४, औरंगाबाद ः २०५६, बीड ः ३६३५, भंडारा ः ६००, बुलडाणा ः ११३०, चंद्रपूर ः ५१७, धुळे ः ३०९६, गडचिरोली ः ४८३, गोंदिया ः ३५७, हिगोली ः ५८०, जळगाव ः १२०२, जालना ः २४३२, कोल्हापूर ः ४७, लातूर ः २३११, नागपूर ः १३३०, नांदेड ः १७२२, नंदुरबार ः ३८३, नाशिक ः १२१९, उस्मानाबाद ः ७०७, पालघर ः ३३८, परभणी ः १९३९, पुणे ः ३५२, रायगड ः १५, रत्नागिरी ः २१, सांगली ः ५११, सातारा ः ५२१, सिंधुदुर्ग ः २११, सोलापूर ः ०, ठाणे ः ९८, वर्धा ः ९२१, वाशीम ः १४६१, यवतमाळ ः ३२९५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com