agriculture news in marathi, status of water circulation through tankers, nagar, maharashtra | Agrowon

पाथर्डी, पारनेरमध्ये सर्वाधिक टॅंकरने पाणीपुरवठा 
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 एप्रिल 2019

नगर : जिल्ह्यात पाणीटंचाईचे गंभीर परिणाम दिसत आहेत. जिल्हाभरात ७२१ टॅंकरने पाणी पुरवठा केला जात असून एकट्या पाथर्डी तालुक्यात तब्बल १४१ टॅंकरने पाणी दिले जात आहे. एप्रिल महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅंकरने पाणी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

नगर : जिल्ह्यात पाणीटंचाईचे गंभीर परिणाम दिसत आहेत. जिल्हाभरात ७२१ टॅंकरने पाणी पुरवठा केला जात असून एकट्या पाथर्डी तालुक्यात तब्बल १४१ टॅंकरने पाणी दिले जात आहे. एप्रिल महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅंकरने पाणी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

जिल्हाभरात यंदा भूजल पातळी खालावलेली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यापूर्वीच या दोन्ही तालुक्‍यांत टॅंकरची संख्या शतकापार गेली. सध्या पारनेरमध्ये १२१, तर पाथर्डी तालुक्‍यात १४१ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय नगरपंचायतींकडूनही या दोन्ही तालुक्‍यांत २२ टॅंकर सुरू आहेत. या वर्षी पावसाने दगा दिल्यानंतर भूजल पातळी खोल गेली. पारनेर व पाथर्डीखालोखाल कर्जत तालुक्‍यातील ४७ आणि कोपरगाव तालुक्‍यातील ४३ गावांमधील भूजलपातळी ही तीन मीटरपेक्षा खोल गेली. या सर्वांचा परिणाम म्हणजे, या तालुक्‍यांमध्ये फेब्रुवारीमध्येच पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करावे लागले.

जामखेड, कर्जत, शेवगाव आणि नगर तालुक्‍यांतही टॅंकरचे अर्धशतक झाले आहे. या आठवड्यात जिल्ह्यातील टॅंकरची संख्या ७२१ झाली असून, पुढच्या महिन्यापर्यंत त्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, श्रीरामपूर तालुक्‍यात अद्याप एकाही टॅंकरची गरज भासलेली नाही. दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कधी नव्हे तो जलस्तर मोठ्या प्रमाणात खोल गेल्याने जिल्ह्यातील ९० टक्के विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. अनेक पाणीयोजनाही बंद पडल्या आहेत. प्रशासनाने टॅंकरच्या मागणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक गावांनी टॅंकरची मागणी केली.

सध्या जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांतील सुमारे ११ लाख १२ हजार ४९५ लोकांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. येथील ४७८ गावे आणि दोन हजार ६९३ वाड्या-वस्त्यांवर टॅंकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा सुरू आहे.
 

टॅंकरची तालुकानिहाय संख्या : संगमनेर ४८, अकोले तीन, कोपरगाव १०, श्रीरामपूर ०, राहुरी  एक, नेवासे २६, राहाता चार, नगर ५८, पारनेर १२१, पाथर्डी १४२, शेवगाव ५९, कर्जत ९३, जामखेड ५०, श्रीगोंदे ४६. नगरपंचायतींकडून पाणीपुरवठा ः पारनेर १६, जामखेड ३८, पाथर्डी ६.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...