सहायक पशुसंवर्धन आयुक्तांच्या बदलीला स्थगिती

सहायक पशुसंवर्धन आयुक्तांच्या बदलीला स्थगिती
सहायक पशुसंवर्धन आयुक्तांच्या बदलीला स्थगिती

नागपूर ः सचिवांनी आधी पुण्यात आणि त्यानंतर मंत्र्यांकडून अवघ्या तेराच दिवसांत उस्मानाबाद जिल्ह्यात बदली करण्यात आली. याविरोधात महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे (मॅट) धाव घेणाऱ्या सहायक पशुसंवर्धन आयुक्‍तांना दिलासा देत मॅटने मंत्र्यांच्या बदली आदेशाला स्थगिती दिली आहे.  बारामती येथे कार्यरत डॉ. नवनाथ नराळे यांची ३१ मे रोजीच्या बदली आदेशान्वये औंध पुणे येथील पशुचिकित्सालयात बदली करण्यात आली होती. पशुसंवर्धन खात्याचे सचिव अनुपकुमार यांनी केलेल्या या ६६ बदल्यांना दुसऱ्याच दिवशी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी स्थगिती दिली. बदल्यांचे सुधारित आदेश लवकरच काढले जातील, असेही त्यांनी त्या वेळी सांगितले. त्यानुसार १३ जून रोजी नव्याने बदली आदेश काढण्यात आले. या बदली आदेशात डॉ. नवनाथ नराळे यांचे बदलीचे ठिकाण बदलण्यात आले होते. औंध, पुणे ऐवजी त्यांची नियुक्‍ती तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथे करण्यात आल्याचे नव्या आदेशात नमूद होते. अवघ्या तेरा दिवसांतच बदलीचे ठिकाण बदलण्यात आल्याने याविरोधात डॉ. नराळे यांनी ‘मॅट’कडे धाव घेतली. यामध्ये कोणतेही कारण न देता पुण्यावरून तुळजापूरला बदली करण्यात आली. त्याच वेळी औंध, पुणे येथील पद मात्र रिक्‍तच ठेवण्यात आले, असा दावा याचिकेतून डॉ. नराळे यांनी केला. डॉ. नराळे यांच्या याचिकेतील दावे विचारात घेत ‘मॅट’ने त्यांच्या बदली संदर्भातील १३ जूनच्या आदेशाला स्थगिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com