Agriculture news in marathi stick to sorghum, mawa; The ghateali on the green Aurangabad, Jalna, Beed Districts | Agrowon

मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा; हरभऱ्यावर घाटे अळी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 जानेवारी 2020

औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन रब्बीची पेरणी झाली. मात्र, ज्वारीवर चिकटा व मावा, तर हरभऱ्यावर पाने खाणारी अळी व घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. शिवाय, अपेक्षित थंडीअभावी गव्हाच्या पिकाचीही वाढ खुंटल्याची स्थिती आहे. 

खरिपावर अवेळी पावसाचे संकट आले. त्यानंतर आता रब्बीच्या पिकांची स्थितीही चिंताजनक आहे. औरंगाबाद,  जालना व बीड जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ५ हजार २८६ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ९ लाख १३ हजार २२१ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. 

औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन रब्बीची पेरणी झाली. मात्र, ज्वारीवर चिकटा व मावा, तर हरभऱ्यावर पाने खाणारी अळी व घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. शिवाय, अपेक्षित थंडीअभावी गव्हाच्या पिकाचीही वाढ खुंटल्याची स्थिती आहे. 

खरिपावर अवेळी पावसाचे संकट आले. त्यानंतर आता रब्बीच्या पिकांची स्थितीही चिंताजनक आहे. औरंगाबाद,  जालना व बीड जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ५ हजार २८६ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ९ लाख १३ हजार २२१ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. 

ज्वारी वाढीच्या, पोटरीच्या अवस्थेत

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ८८ हजार १४० हेक्‍टर आहे. त्या तुलनेत ३ लाख ५८ हजार ६८१ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७३ टक्‍के क्षेत्रावर वेगवेगळ्या वेळात पेरणी झाली. काही ठिकाणी वाढीच्या, काही ठिकाणी पोटरीच्या, तर काही ठिकाणी कणसे लागण्याच्या, भरण्याच्या अवस्थेत आहे. बीड जिल्ह्यात फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत ज्वारी आहे. या पिकावर चिकटा व मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

गव्हाने धरली कांडी 

औरंगाबाद, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख १७ हजार ४१७ हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात १ लाख ९५ हजार ३५४ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १६६ टक्‍के पेरणी झालेले गव्हाचे पीक कांडी धरणे ते वाढीच्या अवस्थेत आहे. थंडी कमी असल्याने गव्हाची वाढ समाधानकारक नसून पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

यंदा रब्बीवर हरभऱ्याचे वर्चस्व 

औरंगाबाद, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५९ हजार ७१० हेक्‍टर आहे. आजपर्यंत ३ लाख १ हजार ४४१ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १८८ टक्‍के क्षेत्रावर हे पीक आहे. काही ठिकाणी फुले व घाटे लागण्याच्या, तर काही ठिकाणी घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. बीड जिल्ह्यात हरभरा पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. काही ठिकाणी घाटे अळीचाही प्रादुर्भाव दिसून आला आहे.


इतर ताज्या घडामोडी
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...